मुंबई : भारतीय क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.
२३ नोव्हेंबर रोजी त्यांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केल्यानंतर काही खास सोशल मीडियामध्ये शेअर केले आहेत.
लग्नानंतर मित्रमंडळी आणि नातेवाईकांसाठी मुंबईत झहीर खान आणि सागरिकाने खास कॉकटेल पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतच सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग, आशीष नेहरा यांसमवेत अनेक क्रिकेटर्स हजर होते.
सागरिका आणि झहीर यांचा खास फोटो Harper Bazaar Bride च्या भारतीय आवृत्तीवर एकत्र झळकले आहेत. या मासिकाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा खास फोटो शेअर करण्यात आला आहे. या दोघांचा हा खास अंदाजातील फोटो सार्यांचेच लक्ष वेधून घेत आहे.
मासिकाच्या 'जस्ट मॅरिड' या विशेष भागासाठी झहीर आणि सागरिकाने फोटोशूट केले. झहीरने जांभळ्या रंगामध्ये तर सागरीकाने गडद हिरव्या रंगातील खास गाऊन परिधान केला आहे. या जोडीचे कपडे फॅशन डिझायनर शंतनू आणि निखील यांनी डिझाईन केले आहेत.
झहीर आणि सागरिका हे नवदांपत्य २७ नोव्हेंबर रोजी लग्नाचे ग्रॅन्ड रिसेप्शन होस्ट करणार आहेत.