अंबानींच्या कार्यक्रमात परफॉर्म करताना जस्टिन बीबरनं मिठी मारलेली 'ती' कोण?

The Girl Whom Justin Bieber Huged at Anant Radhika Sangeet : ज्या मुलीला परफॉर्म करत असताना जस्टिन बीबरनं मिठी मारली ती मुलगी कोण तुम्हाला माहितीये का?

दिक्षा पाटील | Updated: Jul 6, 2024, 11:01 AM IST
अंबानींच्या कार्यक्रमात परफॉर्म करताना जस्टिन बीबरनं मिठी मारलेली 'ती' कोण?  title=
(Photo Credit : Social Media)

The Girl Whom Justin Bieber Huged at Anant Radhika Sangeet : बिझनेस मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नाचा कार्यक्रम सुरु झाला आहे. काल संध्याकाळी अनंत आणि राधिकाच्या संगीतच्या कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात हॉलिवूडचा पॉप सिंगर जस्टिन बीबीरनं लाइव्ह परफॉर्मेंस केलं. काल शुक्रवारी जस्टिन बीबरनं अनंत आणि राधिकाच्या संगीत कार्यक्रमात परफॉर्म केलं. त्यासाठीच तो भारतात आला होता. अंबानींच्या कार्यक्रमात जस्टिननं त्याच्या परफॉर्मन्सनं सगळ्याना वेड लावलं. सगळे त्याच्या चालीवर थिरकताना दिसले. त्यानंतर तो त्याच्या घरी परतला आहे. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात जस्टिननं मिठी मारलेली ती मुलगी कोण असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. त्याविषयी जाणून घेऊया...

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या संगीत कार्यक्रमात जस्टिन बीबरनं गाणी गात सगळ्यांना वेड लावलं. यावेळी जस्टिन बीबरनं त्याची सगळी गाजलेली गाणी यावेळी गायली. ज्यात बेबी बेबी, नेवर लेट यू गो, लव यूअरसेल्फ, पीचेज, बॉयफ्रेंड, सॉरी आणि वेयर आर यू नाऊ अशी गाणी आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दरम्यान, या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. त्यात जस्टीन बीबर हा त्याच्याच गाण्यांपैकी एक गाणं गाताना दिसतो. तर त्यात तो त्याच्या एका चाहतीला स्टेजवर येऊ देतो आणि तिला मिठी मारतो. आता सगळ्यांना प्रश्न आहे की ही कोण मुलगी आहे? आणि ती या कार्यक्रमात कशी? तर ती मुलगी दुसरी कोणी नसून बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरीची लेक अलाविया जाफरी आहे. जस्टिन बीबरनं मिठी मारल्यानंतर तिला जो आनंद झाला तो तिच्या चेहऱ्यावर दिसतोय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हेही वाचा : बॉलिवूडशी नातं असणारा 'हा' भारतीय वंशाचा उमेदवार ब्रिटनमध्ये खासदार; राजकारणात मोठं नाव

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दुसरीकडे आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ बॉलिवूड हंगामानं शेअर केला आहे. या व्हिडीओत जस्टिन बीबर आणि ऑरी एकत्र स्टेजवर गाताना दिसत आहेत. जस्टिन बीबर आणि ऑरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.