बॉलिवूडशी नातं असणारा 'हा' भारतीय वंशाचा उमेदवार ब्रिटनमध्ये खासदार; राजकारणात मोठं नाव

British Indian MP Kanishka Narayan Has Connection : ब्रिटनच्या निवडणूकीत आता आणखी एका भारतीय वंशजानं मारली बाजी... तर त्याचं या अभिनेत्रीशी आहे खास नातं

दिक्षा पाटील | Updated: Jul 6, 2024, 10:17 AM IST
बॉलिवूडशी नातं असणारा 'हा' भारतीय वंशाचा उमेदवार ब्रिटनमध्ये खासदार; राजकारणात मोठं नाव title=
(Photo Credit : Social Media)

British Indian MP Kanishka Narayan Has Connection : ब्रिटनमध्ये झालेल्या निवडणूकीचा निकाल समोर आला आहे. जवळपास 650 जागांवर लढल्या गेलेल्या या निवडणूकीत स्पष्ट झालं की ऋषि सुनक यांची कंजर्वेटिव पार्टी सत्तेत येणार नाहीत. तर लेबर पार्टीचे के किअर स्टार्मर हे पंतप्रधान होणार. दुसरीकडे लेबर पार्टीच्या कनिष्क नारायण हे खासदार पदासाठी विजयी झाले असून, त्यांनी अलुन केर्न्स यांना पराभूत केलं. मागासवर्गीय प्रवर्गातून वेल्समध्ये विजय मिळवणारे ते पहिलेच उमेदवार आहेत. 

नारायण यांच्या विषयी बोलायचे झाले तर त्यांचा जन्म हा बिहारच्या मुज्जफ्फरपुरमध्ये झाला. पण कार्डिफमध्ये लहाणाचे मोठे झाले. आता ते बॅरीमध्ये राहतात. नारायण यांनी Oxford University मधून त्याचं शिक्षण पूर्ण केलं. इथे त्यांनी फिलॉसॉफी, पॉलिटिक्स आणि इकोनॉमिक्सचं शिक्षण केलं. त्यानंतर ते कॉलिफोर्नियाच्या Stanford University मध्ये गेले. जिथे त्यांनी बिझनेस या विषयात मास्टर्सचं शिक्षण घेतलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

राजकारणी होण्या आधी नारायण गवर्नमेंट एडवाइजिंग मंत्रालयात कामाला होते. इथे ते पब्लिक पॉलिसीजवर काम करत होते. त्याशिवाय नारयण यांनी यूरोप आणि यूएसमध्ये देखील काम केलं आहे. लॉकडाऊन दरम्यान, त्यांनी नॅशनल कॅम्पेन सुरु केली होती. ज्यात ब्रिटिश सरकारनं त्यांना मदत केली होती. त्यासोबत अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी यूनिव्हर्सिटीमध्ये अॅडमिशन करून देण्यास मदत केली होती. 

हेही वाचा : कधीकाळी चिकन विकणारा 'हा' चिमुकला, आज गाजवतोय बॉलिवूड; आहे 'इतक्या' कोटींचा मालक

विजय झाल्यानंतर नारायण यांनी BBC Wales ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की त्यांनी सांगितलं की सुरुवातीपासून माझं लक्ष हे Vale of Glamorgan मध्ये लोकांना नोकरी मिळून देण्यावर होतं. त्यामुळे त्याच्यात जागरुकता निर्माण होईल. त्यासोबत त्यांच्यात समृद्धीच्या भावनेने देखील भर पडेल. मला वाटतं की लेबर पक्षात आम्ही केलेल्या बदलांमुळे लोक प्रभावित झाले आहेत. आमचा पक्ष त्यांच्या हिताच्या कोणत्या गोष्टी करेल, हे त्यांना समजलं आहे. या समाजासाठी मी रात्रंदिवस मेहनत करेन. हे माझं वचन आहे.

अभिनेत्रीशी खास कनेक्शन

कनिष्क नारायण हे अभिनेत्री श्रेया नारायणचे भाऊ आहेत. श्रेयानं 'बर्फी', 'रॉकस्टार' आणि 'साहब बीवी और गॅन्गस्टर' मध्ये काम केलं आहे. तिनं एक पोस्ट शेअर करत कनिष्क नारायण यांना खूप शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ती म्हणाली आमच्या कुटुंबासाठी आजचा दिवस खूप मोठा आहे. 20 वर्षांचा त्याग आज यशस्वी झाला आहे. माझी आजी-आजोबा जिथे कुठे आहे ते त्यांचा नातू कनिष्क नारायणच्या स्वप्नांना पूर्ण करताना दिसते. यूकेचे आतापर्यंतचा वयानं सगळ्यात लहान खासदार, माझा भाऊ झाला आहे. ही एक अशी बातमी आहे जी आम्हाला तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायची होती.