Salim Khan On Marrying Marathi Girl : बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा आणि त्याचं कुटुंब हे नेहमीच चर्चेत असतं. तर त्याचे वडील दिग्गज लेखक वडील सलीम खान यांनी अरबाज खानच्या 'द इन्व्हिन्सिबल्स' या चॅट शोमध्ये त्यांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल सांगितलं आहे. ज्यात त्यांनी त्यांची दुसरी पत्नी हेलनसोबतच्या त्यांच्या नात्याबद्दल अनेक किस्से सांगितले. पण याचवेळी सलीम खान यांनी सलमा खान (खरं नाव - सुशीला चरक) यांच्यासोबतच्या भेटीचे, प्रेमाचे आणि लग्नाचे मजेदार किस्से सांगितले.
सलीम खान यांनी याविषयी सांगितलं की ते त्या काळात पंजा लढवण्यासाठी प्रसिद्ध होते आणि त्यामुळेच त्यांची सलमाशी मैत्री झाली. त्यांनी सांगितले की, पूर्वी ते आणि सलमा रस्त्यांवर किंवा आयटर ठिकाणी असे गुपचूप भेटत असते, मात्र सलीम खान यांना अशा प्रकारे भेटणे पसंत नव्हते. सलीम खान म्हणाले की ते एकदा सलमा याना म्हणाले की, 'मला तुला अशा प्रकारे गुप्तपणे भेटायचे नाही, मला तुझ्या पालकांशी बोलायचे आहे.' यावर सलमा म्हणाल्या, 'नाही, हे शक्य नाही'. सलीम खान मात्र त्यांच्या या निर्णयावर ठाम होते ते म्हणाले 'हे सगळं शक्य आहे, माझी भेटू दे'. दरम्यान, अरबाजनं पुढे विचारलं की 'तुम्ही किती वर्षे रिलेशनशिपमध्ये होतात?'. तर यावर उत्तर देत सलीम खान यांनी सांगितले की, 'आम्ही 5 वर्ष रिलेशनशिप मध्ये होतो.'
सलीम खान पुढे म्हणाले, 'मी तिला सांगितलं की मला ही लपून छपून भेटणं आवडत नाही. मी तिच्या घरी गेलो, तेव्हा मला वाटलं की भारतातलं सर्व मराठी एकाच ठिकाणी आलेत की काय. तिथे इतके लोक होते की त्यांना बघून मी कधीच इतका घाबरलो नव्हतो जितका तेव्हा घाबरलो. जणू काही ते एका प्राणी- संग्रहालयात एखादा नवीन प्राणी बघायला आलेत.'
पुढे ते म्हणाले, 'माझ्या सासऱ्यांनी मला सांगितलं की बेटा, मी तुझ्याबद्दल माहित घेतली आहे, तू एका चांगल्या घरातील मुलगा आहेस, शिकलेला आहेस, सर्व काही आहे. आमचा काही आक्षेप नाही, कारण आजकाल चांगली मुले मिळत नाहीत, पण फक्त धर्म स्वीकारला जाऊ शकत नाही. त्यावेळी माझं वय जवळपास 24 वर्षे होतं. मी म्हणालो, डॉक्टर साहेब, तुमच्या मुलीला आणि मला 1760 समस्या असतील, पण धर्म त्यांच्यापैकी कधीच होणार नाही. खरं तर, 1760 पेक्षा जास्त समस्या होत्या परंतु धर्मावर कधीही समस्या नव्हती.
सलीम खान पुढे म्हणाला, 'त्यांनी सांगितलं की तिचं लग्न आम्ही आता नाही करु शकत. तुम्ही जाऊन लग्न करुन घ्या आणि संपवा कारण या प्रकरणावरून आमच्यावर देखील प्रॉब्लम आहेत. मग आम्ही गेलो आणि रजिस्टर करत आम्ही लग्न केलं. तिच्या वडिलांना ते नातं मान्य नव्हते. 10 वर्षांपर्यंत कोणी आलं नाही. मग सोहेलचा जन्म झाला आणि ते रुग्णालयात आले आणि पाहून गेले.'
हेही वाचा : कंगना रणौतला कानशिलात लगावणाऱ्या महिलेला मिळणार 1 लाखांचं बक्षीस? उद्योजकानं केली घोषणा
त्यांनी पुढे सांगितलं की 'शेवटी ते झालं ती जेव्हा त्यांचं (सलमा यांच्या वडिलांचं) निधन होत होतं तेव्हा ते म्हणाले की मी सगळ्या गोष्टींना माफ करेन, पण ते 10 वर्ष जेव्हा मी तुम्हाला भेटलो नाही, त्यासाठी कधी माफ करु शकणार नाही. त्यांनी हे सांगितलं की जे केलं ते योग्य केलं आणि आशीर्वाद दिला की आनंदी रहा.'