Alia Bhatt : आलिया भट्ट हिला विचारला स्टाईल आयकॉनवर प्रश्न, पटकन तिने घेतले या अभिनेत्रीचे नाव

 Alia Bhatt : एका मुलाखतीत आलिया भट्टला विचारण्यात आले की तिचा शेवटचा स्टाईल आयकॉन कोण आहे? ऑप्शनमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सची नावे आलियाला देण्यात आली होती. मात्र आलियाने या अभिनेत्रीचे नाव घेतले. 

Updated: Jun 3, 2022, 03:17 PM IST
Alia Bhatt : आलिया भट्ट हिला विचारला स्टाईल आयकॉनवर प्रश्न, पटकन तिने घेतले या अभिनेत्रीचे नाव   title=

मुंबई : Alia Bhatt style icon : अभिनेत्री आलिया भट्ट  (Alia Bhatt) ही इंडस्ट्रीतील सर्वात  क्यूट आणि होतकरु अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकतेच तिने बॉलिवूडचा हार्टथ्रोब रणबीर कपूर  (Ranbir Kapoor) याच्या सोबत लग्न केले. आलिया भट्टने 2012 मध्ये करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. आलियाने 'हायवे', '2 स्टेट्स', 'बद्री की दुल्हनिया', 'राझी', 'गली बॉय' आणि 'गंगूबाई काठियावाडी' यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले. आलियाचे इंस्टाग्रामवर 66 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याचवेळी, अभिनेत्री एकदा तिच्या स्टाईल आयकॉनबद्दल  (Alia Bhatt style icon) बोलली.

आलियाचा स्टाइल आयकॉन कोण?

फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत आलिया भट्ट हिला तिच्या शेवटच्या स्टाईल आयकॉनबद्दल विचारण्यात आले. या प्रश्नावर तिने उत्तर दिले, करीना कपूर (Kareena Kapoor), सोनम कपूर  (Sonam Kapoor) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padulone) यांना स्टाइल आणि फॅशनची चांगली जाण आहे. याशिवाय तिने अमेरिकन अभिनेत्री अॅन हॅथवेचे नावही घेतले आणि सांगितले की, ती नेहमीच सुंदर कपडे घालते. यासोबतच आलियाने अँजेलिना जोली हिचे नावही शेवटी घेतले. आलिया म्हणाली, 'ती खूप हॉट आहे आणि कोणताही लूक सहज कॅरी करू शकते'.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt  (@aliaabhatt)

या चित्रपटाच्या सेटवर आलिया प्रेमात पडली

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt  (@aliaabhatt)

'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या सेटवर आलिया भट्ट (Alia Bhatt) हिला तिचे प्रेम पाहायला मिळाले. आलिया भट्ट हिने अनेक प्रसंगी रणबीर कपूरवर प्रेम व्यक्त केले आहे. त्याचवेळी, 2020 मध्ये एका मुलाखतीत रणबीर म्हणाला होता की, 'जर कोविड-19 महामारी नसती, तर त्याचे आणि आलियाचे लग्न आधीच झाले असते'. जवळपास 4 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आलिया आणि रणबीरने 14 एप्रिल 2022 रोजी लग्न केले.