Video : एमसी स्टॅनच्या डोक्यात गेली हवा? चाहत्यांसोबत केले धक्कादायक कृत्य

Rapper MC Stan : पुण्याच्या एमसी स्टॅन ऊर्फ अल्ताफ शेखने 'बिग बॉस 16' चे विजेतेपद पटकावले होते. यानंतर एमसी स्टॅनच्या लोकप्रियतेत तुफान वाढ झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याचे कॉन्सर्ट चर्चेत आले आहेत

Updated: Mar 23, 2023, 12:22 PM IST
Video : एमसी स्टॅनच्या डोक्यात गेली हवा? चाहत्यांसोबत केले धक्कादायक कृत्य title=

Rapper MC Stan : बिग बॉस 16 चा विजेता (Bigg Boss 16 winner) एमसी स्टॅन (MC Stan) गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. बिग बॉसचे विजेतेपद मिळवल्यानंतर एमसी स्टॅन देशभरात लाइव्ह कॉन्सर्ट करत आहे. एमसी स्टॅनचा लाईव्ह परफॉर्मन्स ( (MC Stan Live) पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्याचे चाहते गर्दी करत आहेत. मात्र या कॉन्सर्टदरम्यान काही ना काही वादग्रस्त अशा घटना होताना दिसत आहेत. असाच काहीसा प्रकार एका कॉन्सर्टदरम्यान घडलाय.

काही दिवसांपूर्वीच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एमसी स्टॅनला धमकावले आणि मारहाण (MC Stan Fight) केली होती. यानंतर बिग बॉस 16 चा स्पर्धक अब्दू रोजिक (Abdu Rozik) आणि एमसी स्टॅन यांच्यातील भांडण समोर आले होते. त्यानंतर आता सेल्फी घेण्यासाठी आलेल्या एका चाहत्याला एमसी स्टॅनने मारहाण केल्याचे समोर आले आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एमसी स्टॅनच्या या व्हिडिओने सर्वांनाच धक्का बसला आहे. एका कॉन्सर्टनंतर बाहेर पडताना एमसी स्टॅनचे  चाहते त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होते. मात्र एमसी स्टॅनला राग अनावर झाला आणि त्याने गर्दीत कोणाशी तरी भांडणास सुरुवात केली. एमसी स्टॅनच्या अशा वागण्याने त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

पाहा व्हिडीओ -

दरम्यान, नागपुरात 18 मार्च रोजी झालेल्या एमसी स्टॅनच्या कार्यक्रमात हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे. एमसी स्टॅनने किंवा त्याच्या टीमने याबाबत अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. दुसरीकडे एमसी स्टॅनच्या या कृतीमुळे त्याचे चाहते निराश झाले आहेत.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

दरम्यान, 17 मार्च रोजी मध्य प्रदेशमध्ये इंदूरमध्ये एमसी स्टॅनचा लाइव्ह कॉन्सर्ट सुरू असताना त्याला मारहाण झाल्याचे वृत्त समोर आले होते. या कॉन्सर्टला त्याचा चाहत्यांची प्रचंड गर्दी केली होती. त्यानंतर काही जण स्वतःला बजरंग दलाचे सदस्य म्हणवून घेत स्टेजवर पोहोचले आणि त्यांनी मोठा गोंधळ घातला. बजरंग दल उघडपणे एमसी स्टॅनच्या गाण्यांमध्ये महिलांच्या अपवित्र आणि आक्षेपार्हतेच्या विरोधात आहे. याशिवाय एमसी स्टॅन आपल्या गाण्यांमध्ये ड्रग्जला प्रोत्साहन देतो, ज्यामुळे तरुणाईला बरबाद होत असल्याचा आरोप बजरंग दलचा आहे.