खूपच आलिशान आहे प्राजक्ता माळीचं फार्महाऊस; पाहा व्हिडीओ

अभिनेत्री प्राजक्ता माळी जी प्रसिद्ध एक अभिनेत्री म्हणून आहे तितकीच प्रसिद्ध ती एक बिझनेसवूमन म्हणूनही आहे. प्राजक्ताचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. नुकताच प्राजक्ताने एक व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Updated: Feb 15, 2024, 12:00 PM IST
खूपच आलिशान आहे प्राजक्ता माळीचं फार्महाऊस; पाहा व्हिडीओ title=

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. प्राजक्ताचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. कायमच अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते. प्राजक्ताने एखादी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताच ती पोस्ट अवघ्या काही वेळातच व्हायरल होते. प्राजक्ता एक बिझनेस वुमन देखील आहे. प्राजक्ताच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात नेमकं काय सुरु आहे हे जाणून घेण्यासाठी तिच्या चाहत्यांना खूप आवडतं. नुकतीच प्राजक्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये प्राजक्ताच्या फार्महाऊसची झलक पहायला मिळत आहे.

प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिचं फार्महाऊस दिसत आहे. प्राजक्तकुंज असं तिच्या फार्महाऊसचं नाव आहे. एक पोस्ट शेअर करत प्राजक्ताने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, प्रेमाच्या दिवशी, माझं प्रेम आणि जीवन तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे. #prajaktkunj आमची नवीन वेबसाइट आणि सोशल मीडिया हँडल्स लाँच करत आहे. Website- www.prajaktkunj.com Insta- @prajaktkunj FB - Prajaktkunj बाकी यंदाचेही वर्षी, अखिल भारतीय सिंगल संघटनेस, संत व्हेलेंटाईन- दिनाच्या माझ्याकडूनमनापासून शुभेच्छा.. #एकलाचलोरे  अशा आशयाचं कॅप्शन प्राजक्ताने तिच्या पोस्टला दिलं आहे. बाकी… Don’t love, Be the love. हे ब्रीदवाक्य स्मरणी आहेच..

प्राजक्ताच्या या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहीलं आहे की, प्राजक्ता मॅम नेहमी काहीतरी नवीन आणतात. तर अजून एकाने लिहीलंय,  असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती इथे असावा प्रेम-जिव्हाळा नकोत नुसती नाती. या घरट्यातुन पिल्लू उडावेदिव्य घेऊनि शक्तीआकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती.. प्राजू खूप गर्व आहे तुझ्या कर्मसंचयाचा.. तर अजून एकाने लिहीलंय, मी पण अजून तुझ्या सारखाच एकला चलो रे आहे. तर अजून एकाने लिहीलंय, आह सुरेख अगदी. अशा अनेक प्रकारच्या कमेंट प्राजक्ताने या पोस्टवर केल्या आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडीओच्या सुरुवातीला प्राजक्ताच्या प्राजक्तकुंज बाहेरच्या बाजूने दिसत आहे. यानंतर प्रशस्त स्विमिंग पुल दिसतय. यानंतर प्रशस्त हॉल या व्हिडीओच्या माध्यामातून दिसतोय. तर पुढे बेडरुमही खूपच प्रशस्त असल्याचं दिसतं. प्राजक्ताने हा व्हिडीओ शेअर करताच व्हायरल होत आहे.