Tollywood | टॉलिवूड कमाईच्या बाबतीत नंबर 1, बॉलिवूडला 'जोर का झटका'

टॉलिवूड सिनेसृष्टीने  (Tollywood Film Indusrty) 2021 मध्ये नवा इतिहास रचला आहे.  

Updated: Feb 10, 2022, 09:36 PM IST
Tollywood | टॉलिवूड कमाईच्या बाबतीत नंबर 1, बॉलिवूडला 'जोर का झटका'  title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) मुख्य भूमिकेत असलेला पुष्पा (Pushpa The Rise) सिनेमाला प्रेक्षकांनी तुफान डोक्यावर घेतलाय. 'पुष्पा'मधील डायलॉगने तर सर्वसामान्यांना वेड लावलं. जिथं पाहावं तिथं फक्त नि फक्त पुष्पा आणि पुष्पाचीच हवा पाहायला मिळतेय. दरम्यान या पुष्पा सिनेमाने आतापर्यंत जबरदस्त कमाई केली आहे. या कमाईसह पुष्पाने मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे. कमाईच्या बाबतीत टॉलिवूडने बॉलिवूडला पछाडलं आहे. (tollywood become no 1 indian Film Industry in history bollywood sliipped)  

टॉलिवूड सिनेसृष्टीने  (Tollywood Film Indusrty) 2021 मध्ये नवा इतिहास रचला आहे. टॉलिवडूने 2021 मध्ये कमाईच्या बाबतीत बॉलिवूडला (Bollywood Film Indusrty) पछाडत अव्वल क्रमांक पटकावला आहे. टॉलिवूडने 2021 मध्ये जवळपास 1 हजार 300 कोटींची कमाई केली आहे. यानंतर कॉलिवूडचा दुसरा नंबर आहे. कॉलिवूडमध्येही धनुष स्टारर असुरन, कर्णन, मास्टर, जय भीम, या आणि यासारखे अनेक सिनेमे प्रदर्शित झाले. प्रेक्षकांनी या सिनेमाला भरभरुन प्रतिसाद दिला.

बॉलिवडूची तिसऱ्या स्थानी घसरण

देशातील सर्वात मोठी सिनेसृष्टी असलेल्या बॉलिवडूची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये बॉलिवूडने 700 कोटींची कमाई केली आहे.
        
दरम्यान पुष्पाने आतापर्यंत 300 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. पुष्पा या सिनेमाचं दिग्दर्शन हे सुकुमार यांनी केलं आहे. प्रेक्षक पुष्पा सिनेमावर भरभरुन प्रेम करत आहेत.