The Kerala Story Censor Board: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे ती म्हणजे The Kerala Story या हिंदी चित्रपटाच्या ट्रेलरची. हा चित्रपट सुदीप्तो सेन यांनी दिग्दर्शित केला आहे. परंतु या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटावर आक्षेप घेतले जात आहेत. या चित्रपटाचा टीझर हा मागच्या वर्षी प्रदर्शित झाला होता पण काही दिवसांपुर्वी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटावरून बराच वादंग उभा राहिला आहे. 5 मेला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाला (Censor Board) सेन्सॉर बोर्डकडून 'ए' प्रमाणपत्र मिळालं आहे.
'सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन' म्हणजेच सीबीएफसीनं (CBFC) या चित्रपटातील 10 दृश्ये काढून टाकली आहेत. त्यात केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांची मुलाखतही आहे. हे केरळचे मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन असल्याचे सांगितलं जात आहेत. या चित्रपटातून चुकीची माहिती आणि प्रोपोगंडा पसरवण्यात येतो आहे असं या चित्रपटाला विरोध करण्यांचे म्हणणे आहे. या चित्रपटाला झालेला विरोध पाहाता या चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्मा (Ada Sharma) हिनं आपली भुमिका सोशल मीडियावरून मांडली होती. (the censor board removes 10 scenes from the hindi movie the kerala story including the kerala former chief minister)
The Kerala Story या चित्रपटातील 10 दृश्यांवर कात्री फिरवण्यात आली आहे. या चित्रपटांतील संवादांवर कात्री टाकली आहे. चित्रपटातील 'भारतीय कम्युनिस्ट्स हे सर्वात मोठे ढोंगी आहेत' या वाक्यातील भारतीय हा शब्द हटवण्यात आला असल्याचे कळते आहे. त्याचसोबत या चित्रपटात केरळच्या माजी मुख्यमंत्र्याची (Kerala Chief Minister) मुलाखत आहे. त्यात एका सीनमध्ये ते असं म्हणतात की 'केरळ पुढील दोन दशकात मुस्लिम बहुल राज्य बनेल कारण इथल्या तरूणांना इस्लाम धर्म स्विकारण्यास प्रभावित केलं जातं आहे.' सेन्सॉर बोर्डानं ही संपूर्ण मुलाखत काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा - Met Gala : एक लाख मोतींनी सजवलेला ड्रेस, पण 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला पापाराझी समजले ऐश्वर्या
केरळमधल्या मुस्लिम युथ लीगनं 32 हजार मल्याळी महिलांना आयएसआयएसनं दहशतवादी बनवलं हे सिद्ध करणाऱ्याला एक कोटी रूपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे तर सेन्सॉर बोर्डानं चित्रपटाच्या टीझरमध्ये नमूद केलेल्या आकाड्याला सिद्ध करणारी अधिकृत कागदपत्रे निर्मात्यांकडे मागितली आहे. सीपीएम आणि कॉंग्रेसनं चित्रपट प्रदर्शित न करण्याची भुमिका मांडली आहे तर वितरकांनी म्हणलंय की जर हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला नाही तर तो प्रेक्षक ओटीटीवर पाहतील तेव्हा तो चित्रपटगृहातच प्रदर्शित करावा. सध्या या चित्रपटावर केरळ सरकारनं आणि विरोधी पक्षांतील नेत्यांनी राज्यात चित्रपट न दाखवण्याची मागणी केली आहे.