Sunny Leone: अभिनेत्री सनी लिओनी थोडक्यात बचावली, फॅशन शो व्हेन्यूजवळ मोठा स्फोट!

Sunny Leone : आत्तापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने हा स्फोट घडवून आणण्याची जबाबदारी घेतली नसल्याने पोलीस देखील प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

Updated: Feb 5, 2023, 12:05 PM IST
Sunny Leone: अभिनेत्री सनी लिओनी थोडक्यात बचावली, फॅशन शो व्हेन्यूजवळ मोठा स्फोट! title=
Sunny Leone

Sunny Leone : मणिपूर मधील (Manipur) इम्फाल येथे एका फॅशन शोसाठी अभिनेत्री सनी लिओनीला (Sunny Leone) आमंत्रित करण्यात आलं होतं. अशातच फॅशन शो व्हेन्यू जवळ मोठा धमाका झाल्याचं समोर आलं आहे. मणिपूरची राजधानी (Capital of Manipur) असलेल्या इंफाळ (Imphal) येथील हट्टा कांगजेबुंग भागात ही घटना घडली. त्यामुळे आता मणिपूरमध्ये मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळालंय. कार्यक्रम स्थळापासून 100 मीटर अंतरावर हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. (sunny leone shows stopper bomb explosion near fashion show venue in manipur imphal news)

इंफाळ पूर्व एसपी महाराबम प्रदीप सिंह (Pradeep Singh) यांनी या प्रकरणावर माहिती दिली आहे. शनिवारी सकाळी 6.00 वाजता हा स्फोट झाला होता. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. स्फोट झाल्याच्या काही अंतरावर सनी लिओनीच्या कार्यक्रमासाठी स्टेज बांधण्याचं काम सुरू होतं. उद्या म्हणजेच 5 फेब्रुवारीला सनी लिओनीचा फॅशन शो (fashion show) होणार होता.

कार्यक्रमात झालेला हा स्फोट एक्सप्लोसिव डिव्हाईज किंवा ग्रेनेडमुळे झाला असावा, असा अंदाज लावला जात आहे. आत्तापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने हा स्फोट घडवून आणण्याची जबाबदारी घेतली नसल्याने पोलीस देखील प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

आणखी वाचा - Sunny Leone च्या बोल्ड आणि हॉट अदांची चाहत्यांवर मोहिनी

दरम्यान, सनी लिओनीच्या कार्यक्रमाचे (Sunny Leone Show) अनेक तिकीट देखील बुक करण्यात आले होते. मात्र, आता कार्यक्रमावर पाणी फेरणार असल्याचं चित्र आता समोर आलंय. सोशल मीडियावर सनी लियोनी ही नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये येऊन मला 10 वर्ष झाली. मात्र, अजूनही लोकं मला काहीही बोलतात, त्याचं मला काही वाटत नाही, असं सनी लिओनी म्हणाली होती.