Animal मधील बॉबी देओलच्या लुकवर भाऊ सनी देओलची एका शब्दातच प्रतिक्रिया?

Sunny Deol and Bobby Deol Animal Look: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे Animal या रणबीर कपूरच्या चित्रपटाची. या चित्रपटातून रश्मिका मंदाना, रणबीर कपूर यांची जोडी पाहयला मिळणार आहे. त्यातून अनिल कपूर आणि बॉबी देओलचाही भन्नाट लूक आहे. यावेळी सनी देओलनं आपल्या भावाच्या या नव्या लुकविषयी प्रतिक्रिया दिली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 1, 2023, 05:45 PM IST
Animal मधील बॉबी देओलच्या लुकवर भाऊ सनी देओलची एका शब्दातच प्रतिक्रिया?  title=
sunny deol reaction on bobby deol look in animal movie

Sunny Deol and Bobby Deol Animal Look: यावर्षी आलेला सनी देओलचा 'गदर 2' हा चित्रपट प्रचंड गाजला आहे. यावर्षी या चित्रपटानं काही दिवसांतच तूफान कमाई केली होती. त्यामुळे या चित्रपटाची हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तूफान चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. गेल्या काही महिन्यांपासून हा चित्रपट थिएटर्समधून हलायचं नावचं घेत नाहीये. आता देओल कुटुंबियांची चांगलीच चर्चा आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. तेव्हा त्यांच्या आणि ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या लिपलॉक कीसची चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यातून त्यांच्यावर काहींनी टीकाही केली होती. आता वर म्हटल्याप्रमाणे अभिनेता सनी देओलचा 'गदर 2' हा चित्रपटही यावेळी प्रचंड गाजला होता. आता धर्मेंद्र आणि सनी देओलनंतर चर्चा आहे ती म्हणजे अभिनेता बॉबी देओल याची. 

रणबीर कपूरचा 'अॅनिमल' हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची गेल्या दोन वर्षांपासून जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. आता या वर्षीच्या डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून अनिल कपूर आणि रणबीर कपूर यांची फादर एण्ड सन, वडील आणि मुलगा यांची जोडी दिसणार आहे. त्यामुळे त्या दोघांच्याही जोडीची सध्या जोरात चर्चा आहे. अनिल कपूर यांचा निराळा अवतार यावेळी या चित्रपटातून पाहायला मिळतो आहे.

सध्या अनिल कपूरही भलतेच फॉर्ममध्ये आले आहेत. त्यातून त्यांच्या अनेक भुमिकाही फार गाजत आहेत. त्यांनी आता ओटीटीवरही पदार्पण केलेले आहे. यंदा त्यांच्या या चित्रपटातील भुमिकेची फारच चर्चा आहे. या नव्या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. 

हेही वाचा : उर्फीच्या आतला शैतान झाला जागा? 'हा' लूक पाहूनच हात थरथर कापू लागतील

1 डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. हा चित्रपट खरंतर सध्या प्रचंड उत्सुकतेचा विषय ठरला आहे कारण या चित्रपटाची कथा ही फारच वेगळी आणि आकर्षक दिसते आहे. त्यातून रणबीर कपूरचा लुकही भन्नाट आहे. यातून बॉबी देओलही वेगळ्या भुमिकेतून आला आहे. नुकतीच 'ल्लल्नटॉप सिनेमा' दिलेल्या मुलाखतीत सनी देओल यानं आपल्या भावाच्या या नव्या लुकवर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, ''डेडली, मला नाही वाटतं आता कोणताच हिरो हा विलनच्या समोर येईल.'' या चित्रपटातून बॉबी देओल हा नकारात्मक भुमिकेतून दिसणार आहे.