प्रियांका चोप्राच्या घरी पुन्हा एकदा गुडन्यूज, त्या फोटोंमुळे एकच चर्चा

 प्रियांका चोप्राच्या चाहत्यांना गुड न्यूज मिळाली आहे

Updated: Feb 15, 2022, 04:36 PM IST
 प्रियांका चोप्राच्या घरी पुन्हा एकदा गुडन्यूज, त्या फोटोंमुळे एकच चर्चा title=

मुंबई :  देसी गर्ल प्रियांका चोप्राची मोठी जाऊ आणि हॉलिवूड अभिनेत्री सोफी टर्नर तिच्या नवीन फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सोफी तिचा पती जो जोनाससोबत लंचला जाताना स्पॉट झाली आहे. अशा परिस्थितीत पापाराझींनी सोफी आणि जोचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

सोफी टर्नर आणि जो जोनास नुकतेच त्यांच्या मित्रमंडळींसोबत बाहेर जेवायला गेल्याचं दिसून आलं. यावेळी सोफी हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. फोटोंमध्ये सोफीला पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावला.

फोटोंमध्ये सोफी टर्नरचे बेबी बंप दिसत असल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे. सोफी लवकरच दुसऱ्या बाळाला जन्म देणार असल्याचं बोललं जात आहे. सोफी आणि जो यांच्या फोटोंमुळे जोनस कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याचं बोललं जात आहे.

आता सोफीने आपलं बेबी बंप फ्लॉन्ट केलं आहे. ती पती जो जोनस आणि मुलीसोबत स्पॉट झाली आहे. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप घातला होता. 

हे फोटो समोर येताच सोफी टर्नरसह अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या चाहत्यांना गुड न्यूज मिळाली आहे. नुकताच प्रियांकाने सरोगसीद्वारे बाळाला जन्म दिला. आता पुन्हा एकदा संपुर्ण कुटुंब चाहत्यांना गोड बातमी देत आहेत.