सोनू सूदला आली होती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची ऑफर! 'या' भीतीमुळे दिला नकार

Sonu Sood : सोनू सूदला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची आली होती ऑफर... अभिनेत्यानं नकार देण्याचं कारण सांगत केला खुलासा 

दिक्षा पाटील | Updated: Dec 26, 2024, 12:49 PM IST
सोनू सूदला आली होती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची ऑफर! 'या' भीतीमुळे दिला नकार title=
(Photo Credit : Social Media)

Sonu Sood : कोरोना काळात 2020 मध्ये लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्या दरम्यान, सगळ्यांच्या मदतीला कोणता बॉलिवूड सेलिब्रिटी आला असेल तर तो दुसरा कोणी नसून सोनू सूद आहे. सोनू सूदनं देशात आणि परदेशात वेगवेगळ्या भागात अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी जाण्यास मदत केली. आज देखील त्याच्या घराच्या बाहेर मदत मागण्यासाठी अनेक लोकांची गर्दी होते. त्यानं खुलासा केला की पॉलिटिक्स जॉइन करण्याची ऑफर मिळाली होती. 

'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या मुलाखतीत सोनू सूदनं खुलासा केला की त्याला मुख्यमंत्री या उपमुख्यमंत्री होण्याची ऑफर मिळाली. याविषयी सांगताना सोनू सूद म्हणाला, 'मला मुख्यमंत्री पदाची ऑफर मिळाली होती. जेव्हा त्यांना मी नकार दिला, तेव्हा त्यानं सांगितलं की तेव्हा ते म्हणाले मग उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. हे देशातील अत्यंत प्रभावशाली लोक होते, ज्यांनी मला राज्यसभेत बसण्याची ऑफरही दिली होती.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पुढे सोनू म्हणाला, त्यांनी मला सांगितलं की राज्यसभेचे सदस्य व्हा, आमच्यासोबत ये. राजकारणात कशासाठीही संघर्ष करण्याची गरज नाही. हे एक अ‍ॅडव्हेंचर असेल. जेव्हा असे दिग्गज लोक तुम्हाला भेटू इच्छिता आणि तुम्हाला या जगात बदल घडवण्यासाठी प्रोत्साहीत करतात. 

सोनूनं या ऑफर्सला घेऊन सांगितलं की 'जेव्हा तुम्हाला लोकप्रियता मिळते तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाऊ लागतात. पण जास्त वर गेलो तर तिथे ऑक्सिजन लेव्हल कमी होते. आपल्याला वर जायचं असतं, पण हे गरजेचं आहे की तुम्ही किती काळ तिथे टिकून रहाल. तुमच्या इंडस्ट्रीत अनेक बडे कलाकार आहेत. आपल्या इंडस्ट्रीत अनेकांना मोठा कलाकार होण्याचं स्वप्न देखील पाहू शकत नाही आणि तुम्ही नकार देत आहात?' 

हेही वाचा : बिग बींनी आधी विचारला 'हनीमून'चा अर्थ; नंतर 3.20 लाखांच्या प्रश्नावर स्पर्धकाने काय केलं जाणून घ्या

सोनूनं सांगितलं की 'राजकारणात लोकं एकतर पैसा कमावण्यासाठी किंवा सत्ता मिळवण्यासाठी येतात. मला कोणाच्या आधाराची गरज नाही. मी कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सगळ्यांची मदत करतो. त्यांना त्यांचं स्वातंत्र्य गमावण्याची भीती आहे.' त्यामुळे त्याला राजकारणात यायचं नाही. तर राजकारणात येणं म्हणजे यशस्वी होण्यासोबत आणखी दुसऱ्या जबाबदाऱ्या देखील येतात. त्यामुळे करिअरच्या ज्या शिखरावर असतो तिथे टिकून राहणं कठीण होतं.