सोहानं वडिलांच्या थडग्यावर ठेवला केक; लोक संतापून म्हणाले, 'इस्लाममध्ये हे मान्य नाही, अल्लाह...'

Soha Ali Khan- Mansoor Ali Khan: सोहा अली खाननं वडील मंसूर अली खान यांच्या जन्म दिवसानिमित्तानं एक पोस्ट शेअर केली त्यामुळे त्यांची चांगली चर्चा रंगली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jan 6, 2025, 11:40 AM IST
सोहानं वडिलांच्या थडग्यावर ठेवला केक; लोक संतापून म्हणाले, 'इस्लाममध्ये हे मान्य नाही, अल्लाह...' title=
(Photo Credit : Social Media)

Soha Ali Khan- Mansoor Ali Khan: रविवारी 5 जानेवारी रोजी मंसूर अली खानची यांचा 84 वा जन्मदिवस होता. त्या दिवसाला खास बनवण्यासाठी आणि सेलिब्रेट करण्यासाठी त्यांची लेक सोहा अली खाननं त्यांच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे. सोहा अली खाननं शेअर केलेल्या या पोस्टला पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

सोहा अली खाननं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सोहा ही तिचा पती कुणाल खेमू आणि लेक इनायासोबत मंसूर अली खान यांच्या थडग्याच्या इथे गेली होती. तिथे गेल्यानंतर सोहा अली खाननं मेणबत्ती लावली. त्यानंतर तिला विझवली आणि केक तिथे ठेवला. सोहानं प्रेमानं हे तिच्या वडिलांसाठी केलं असलं तरी देखील अनेक मुस्लिम धर्मातील काही लोकांना पटलेलं नाही आणि त्यानं सोहाला इस्लामचे नियम आठवून दिले आहेत. सोहानं ही पोस्ट शेअर करत 'आज 84 वर्ष' झाले असते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सोहानं शेअर केलेली ही पोस्ट पाहून लोक संतापले आणि त्यांनी म्हटलं की थडग्यावर केक कसं काय ठेवू शकतात. एक नेटकरी म्हणाला, 'जेव्हा तुम्हाला तुमच्या धर्माविषयी 0 ज्ञान असतं. अल्लाह तिनं केलेल्या पापांसाठी माफ करा आणि तिला स्वर्गात सगळ्यात उच्च स्थान द्या. तुम्ही लोकांना फतेहा वाचायला हवा, कृपया यापुढे असं करू नका, इस्लाममध्ये या सगळ्याला परवानगी नाही.' दुसरा नेटकरी म्हणाला, थडग्यावर केक का ठेवला आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, 'अस्तागफिरुल्लाह पागल लोकं.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'कोणत्या धर्मात थडग्याला केक देतात? हिंदूंमध्ये?' दुसरा नेटकरी म्हणाला, 'सोहा मॅम... आपण कधीच थडग्याचे फोचो काढायला नको, त्यातही केक किंवा खाण्याच्या काही गोष्ट देखील देऊ नये... त्यांना फक्त आपल्या प्रार्थनेची गरज असते.'

हेही वाचा : सावत्र आईचा उल्लेख करताना अर्जून कपूरने श्रीदेवीसाठी काय विशेषण वापरलं पाहिलं का?

मंसूर अली खान यांच्या विषयी बोलायचं झालं तर 5 जानेवारी 1941 मध्ये मंसूर अली खान यांचा जन्म झाला होता. ते पतौडीचे नवाबच्या नावानं ओळखतात. याशिवाय त्यांची दुसरी ओळख म्हणजे ते भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील अप्रतिम क्रिकेटपटूंपैकी एक होते. 1960 ते 1970 या संपूर्ण दशकात मंसूर अली खान हे भारतीय क्रिकेट टीमचे कर्णधार होते. ते त्यांच्या शांत स्वभावासाठी ओळखले जायचे.