रंग माळियेला.... सिद्धार्थ-मितालीच्या लग्नाचा टीझर

लग्नाचा खास अनुभव.... 

Updated: Jan 31, 2021, 01:19 PM IST
रंग माळियेला.... सिद्धार्थ-मितालीच्या लग्नाचा टीझर  title=

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar)  हे २४ जानेवारी रोजी थाटामाटात पुण्यातील ढेपे वाडा येथे विवाहसोहळा संपन्न झाला. या लग्नसोहळ्याचा टीझर नुकताच लाँच करण्यात आला आहे. या टीझरने सगळ्यांनाच पुन्हा एकदा सोहळ्यातील खास क्षण अनुभवता आले. 

मराठी सिनेसृष्टीतील क्युट कपल म्हणून सिद्धार्थ आणि मिताली ओळख आहे. त्यांच्या या विवाहसोहळ्याची चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर आज दोघंही लग्नाच्या बेडीत अडकले. पुण्यातील ढेपे वाड्यात सिद्धार्थ आणि मिताली विवाहबद्ध झाले. या लग्नाला मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gaatha (@gaatha.co.in)

दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंन्टाइन्स डेच्या दिवशी सोशल मीडियावर सिद्धार्थ आणि मिताली यांनी प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर दोघांचा साखरपुडा पार पडला होता. अभिनेत्री अभिज्ञा भावे तिच्या पतीसोबत या विवाबसोहळ्यात सहभागी झाली होती. तर पूजा सावंत, भूषण प्रधान, उमेश कामत, सई ताम्हणकर, हे देखील सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नाला आले होते.

पारंपारिक मराठमोळ्या पद्धतीनं सिद्धार्थ-मितालीचा विवाह पार पडला. मितालीनं हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती, तर सिद्धार्थनं निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.