मुंबई : पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान काही दिवसांपूर्वी एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांच्या डेटींगच्या बातम्या सातत्याने समोर येऊ लागल्या. मात्र, नंतर पलकने याला मैत्री म्हणत डेटिंग नाकारली. पलक तिवारी दिसायला खूप सुंदर आहे आणि अलीकडेच तिच्या 'बिजली बिजली' या म्युझिक व्हिडिओने धूम केली आहे.
नुकतंच तिला एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला की, तिच्या आईने तिला भूमिका मिळवून देण्यासाठी मदत केली का? तिचे वडील राजा चौधरी यांच्याशी असलेलं नातं याचबरोबर इब्राहिम अली खान सोबतच्या डेटिंगबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले. या सगळ्या प्रश्नांची मोकळेपणाने उत्तरे देण्यात आली. पलक सध्या तिचा डेब्यू चित्रपट रोझी: द केसर चॅप्टरच्या प्रदर्शनासाठी तयारी करत आहे.
पलकने दिलेल्या एका मुलाखतीत, पलक तिवारीला तिची आई श्वेता तिवारीच्या लोकप्रियतेबद्दल विचारण्यात आलं. यावर पलक म्हणाली, मला टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये फायदे मिळू शकले असते. कारण माझी आई येथे सक्रिय आहे. खरं तर, माझी आई मला नेहमी सांगते की, तिला मला मदत करायची आहे. पण मला स्वतःच करिअर स्वत: घडवायचं आहे. माझ्या आयुष्यात जे काही आहे ते माझ्या आईमुळे आहे. पण आता मला तिने विश्रांती घ्यावी असं वाटतं.
पुढे, पलक तिवारीला प्रेम आणि लग्नाबद्दल तिचं मत विचारलं. दोन अयशस्वी विवाहांतून जात असल्याचं पाहून ती निराश झाली आहे. ती म्हणते, 'अजिबात नाही कारण मी माझ्या आईला नेहमीच एक चांगली पत्नी म्हणून पाहिलं आहे. मी माझ्या आजीला पण पाहिलं आहे.
म्हणून, मला माहित आहे की प्रेम होतं, प्रेम आहे. आणि राहिल. लग्नाबद्दल माझी मतं नकारात्मक नाहीत. पण लग्नाची घाई करू नये हेही माझ्या लक्षात आलं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की, त्या व्यक्तीमध्ये काहीतरी चुकीचं आहे, तर त्यावेळीच ते सोडणं चांगलं.
महिलांना याचा सर्वाधिक संघर्ष करावा लागतो आणि मी हे केवळ माझ्या आईसोबतच नाही, तर जगभरातील महिलांसोबत पाहिलं आहे. आपण आपल्या जोडीदारासाठी गोष्टींचं समर्थन करत राहतो कारण आपल्याला लोकांचं चांगलं पहायचं असतं. ही एक चांगली गुणवत्ता आहे. मात्र ते तुम्हाला त्रास देईल. हे प्रेम नाही किंवा किमान मला हवं असलेलं प्रेम नाही.
दुसरीकडे, पलकने इब्राहिम अली खानसोबतच्या तिच्या लिंकअपबद्दल सांगितलं की, ही मूर्खपणाची केवळ अफवा आहे. मला वाटतं की मी प्रेमासाठी खूप लहान आहे. प्रेम खूप खोल आहे आणि या क्षणी मला वाटत नाही की मी माझ्या कुटुंबाशिवाय इतर कोणावरही प्रेम करू शकेन.