मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी अनेक वर्षे आपल्या आवाजाने चाहत्यांना निखळ आनंद दिला आहे. ज्या आवाजावर आज जग असिम प्रेम करतं हा आवाज बंद करण्याचा एकदा प्रयत्न करण्यात आला आहे. लता दिदींनीच एकदा खुलासा केला होता की, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. लता मंगेशकर यांच्यावर विषप्रयोग झाल्याचा खुलासा त्यांनी स्वतः केला होता. तसेच प्रसिद्ध कवियित्री आणि हिंदी साहित्यकार पद्मा सचदेव यांच्या पुस्तकात 'ऐसा कहां से लाऊं' यामध्ये याचा खुलासा केला आहे. ही बाब अतिशय धक्कादायक आहे.
लता दीदी सांगितल्याप्रमाणे, 1962 ची घटना जेव्हा त्या 33 वर्षांच्या होत्या. एक दिवशी त्या झोपून उठल्या तेव्हा त्यांच्या पोटात अचानक दुखू लागलं. यानंतर त्यांना 3-4 उलट्या झाल्या त्याचा रंग काहीसा हिरवा होता. यानंतर त्यांचा त्रास एवढा वाढला की त्यांना एका जागेवरून हलताही येत नव्हतं. घरात उपस्थित असलेल्या मंडळींनी तात्काळ डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले पण त्यानंतर तीन दिवस लता दीदी जीवन आणि मृत्यूच्यामध्ये संघर्ष करत होत्या.
लता दीदींनी स्वतः मला स्लो पॉयझन दिल्याचा नंतर खुलासा केला. विषामुळे माझ्या आवाजावर परिणाम झाला. त्या खूप अशक्त झाल्या होत्या. तीन महिने त्यांना अंथरूणात रहावं लागलं होतं. त्यांना जेवणातून स्लो पॉयझन देण्यात आलं होतं. या घटनेनंतर बहिण उषा मंगेशकर यांनी दीदींच्या खाण्याची संपूर्ण जबाबदारी स्विकारील होती.
धक्कादायक बाब म्हणजे या घटनेनंतर लता मंगेशकर यांच्या घरी जेवण करणार महाराज पळून गेले. त्याने आपला पगार न घेताच कोणतीही माहिती न देता घर सोडलं. जेवण करणारे हे महाराज या अगोदर इतर बॉलिवूडशी संबंधीत मंडळींकडे जेवण करत असे. पद्मा सचदेव यांनी लिहिलेल्या पुस्तकात म्हटलं आहे की, या घटनेनंतर लता दीदी खूप अशक्त झाल्या. तीन महिने सक्तीचा आराम करावा लागला. घशाला इतका त्रास होत असे की खूप काळजी घ्यायला लागली. लता दीदी तीन महिने फक्त थंड सूप घेत असतं.
या घटनेनंतर त्यांना '२० साल बाद'चे गाणे रेकॉर्ड करायचे होते. '२० साल बाद'साठी त्यांनी एक गाणे गायले 'कहीं दीप जले कहीं दिल' हा किस्सा संगीतकार श्री रामचंद्र यांनी आपल्या पुस्तकात लिहीला आहे. आजपर्यंत त्या स्लो पर्यंत त्या स्लो पॉयझनचा उलघडा झालेला नाही. लता दीदींनी 30 हजारहून अधिक गाणी गायली आहेत. तर 7 दशकांहून अधिक काळ हिंदी गाण्यातील जगावर राज केलं आहे. लता मंगेशकर 28 सप्टेंबर 1929 मध्यप्रदेश इंदौरमध्ये झाला.