'शाका लाका बूम बूम' च्या संजूनं केला साखरपुडा! जाणून घ्या होणारी बायको कोण?

Shaka Laka Boom Boom Sanju Got Engaged : 'शाका लाका बूम बूम' मालिकेतील संजूनं उरलका साखरपुडा! कोण आहे होणारी बायको...

दिक्षा पाटील | Updated: Aug 24, 2024, 11:42 AM IST
'शाका लाका बूम बूम' च्या संजूनं केला साखरपुडा! जाणून घ्या होणारी बायको कोण?  title=
(Photo Credit : Social Media)

Shaka Laka Boom Boom Sanju Got Engaged : अभिनेता किंशुक वैद्यनं 'शाका लाका बूम बूम' या लोकप्रिय मालिकत बालकलाकाराची भूमिका साकारत करिअरची सुरुवात केली. 'शाका लाका बूम बूम' मधील संजू या भूमिकेमुळे त्याच्या चाहत्यांची संख्या प्रचंड वाढली. आजही त्याची भूमिका अनेक प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मात्र, या सगळ्यात चर्चा आहे ती किंशुकच्या साखरपुड्याची. किंशुकनं लॉन्ग टाईम गर्लफ्रेंड आणि कोरिओग्राफर दीक्षा नागपालसोबत साखरपुडा केला आहे. त्यासोबत त्यानं त्याच्या नात्याला नावं देत आयुष्याच्या नव्या टप्याची सुरुवात केली आहे. 

किंशुक वैद्य आणि दीक्षा नागपाल हे दोघेही या खास दिवशी सुंदर दिसत आहेत. त्या दोघांनी पारंपारिक गडळ निळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये त्यांना एकमेकांचा हाथ पकडला आहे. तर दुसऱ्या फोटोत ते फोटोत अंगठी दाखवत आहेत. त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दोघांचे हे सुंदर फोटो एका नव्या आणि आनंदी प्रवासाची सुरुवात करत असल्याचे दर्शवण्यात येत आहे. फोटो शेअर करत त्यांनी एका वाईट नजरेपासून वाचून राहण्यासाठी इमोटीकॉन शेअर केलं आहे. किंशुक वैद्य आणि दीक्षा नागपालच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्या दोघांच्या पोस्टवर टेलिव्हिजन सेलिब्रिटी देखील शुभेच्छा देत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

शहीर शेख, हिबा नवाब, दिशा परमार, राची शर्मा, वैष्णवी गनात्रासोबत अनेक लोकप्रिय कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. किंशुक वैद्य आणि दीक्षा नागपाल एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखत होते. दोघे अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबत फोटो शेअर करायचे. 

हेही वाचा : बापरे! समांथाला काय झालं? अभिनेत्रीचा अवतार पाहून चाहत्यांची चिंता वाढली; म्हणाले, 'खाणं-पिणं...'

किंशुक वैद्यच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तो अलबेला वो तो है अलबेला, शाका लाका बूम बूम आणि एक रिश्ता साझेदारी का या मालिकांमध्ये काम केलं आहे. किंशुकच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर दीक्षा नागपाल आधी तो त्याच्या सह-कलाकार शिव्या पठानियासोबत रिलेशनशिपमध्ये होता. बरीच वर्ष ते रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, 2021 मध्ये ते विभक्त झाले. दीक्षा एक प्रोफेशन्ल कोरियोग्राफर आहे. ती अनेकदा शोच्या सेटवर डान्स कोरिओग्राफर करताना दिसते.