Shahid Kapoor : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरला त्याच्या बालपनी त्याच्या वडिलांची कमी फार जाणवली. त्याला सिंगल मदर नीलिमा अजीम यांनी लहानाचं मोठं केलं. त्यानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की लहाण असताना जेव्हा वडिलांची साथ नसल्यानं त्याचा छळ करण्यात आला. त्यानं आई-वडिलांची तुलना ही दोन पायांशी केली की जर एक नसेल तर आयुष्याचं संतुलन बिघडतं.
शाहिद कपूर हा 3 वर्षांचा असताना त्याचे वडील पंकज कपूर हे नीलिमा अजीम यांच्यापासून विभक्त झाले. त्यानं सांगितलं की 'वडिलांच्या कमीचा त्याच्यावर कसा परिणाम झाला. शाहिद म्हणाला, मी अशा घरातून आहे, जिथे माझे आई-वडील मी 3 वर्षांचा झालो त्यानंतरच ते सोबत नव्हते. माझ्या आईसोबत मी जास्त काळ राहिलो. वर्षातून एकदाच मी माझ्या वडिलांना भेटायचो. त्यामुळे माझ्या आयुष्यात पुरुषांचा वावार कमी होता. खूप म्हणजे खूप कमी.'
शाहिद पुढे म्हणाला, 'तुमच्या आयुष्यात आई-वडील हे दोन पायांसारखे असतात पण जेव्हा एक पालक नसतो तेव्हा तुम्हाला वाटतं की एक पाय नसल्यानं तुम्ही संतुलन मिळवू शकत नाही आहात. दोन्ही पालकांचं तुमच्या आयुष्यात काही महत्त्व असतं. तुम्ही त्यवर काही स्पष्टीकरण देऊ शकत नाही.'
शाहिदनं सांगितलं की 'वडीलसोबत नव्हते त्यामुळे मामा अनकंजीशन्ली सोबत राहायचे. शाहिदच्या आयुष्यावर त्यांचा खूप प्रभाव पडला आहे. शाहिदनं सांगितलं की लहाण असताना सगळ्यात जास्त स्ट्रॉन्ग आठवण जर कोणती असेल तर ती आजोबांसोबतची आहे. शाहिदसोबत त्याचे वडील नाहीत म्हणजे त्याच्या आजुबाजुला असणारे लोक त्याला वाईट वाटेल असं बोलायचे.'
हेही वाचा : 'इतिहासात औरंगजेब आहे पण भारतीय सेना नाही...'; अक्षय कुमारला बदलायचाय इतिहास
शाहिद म्हणाले, 'मुलं फार खोडकर असतात. तर एकवेळ येते जेव्हा तुमच्या पालकांपैकी एक व्यक्ती नसते. तर त्याविषयी तुम्हाला वाईट वाटेल असं काही तरी करतात, जेणे करून हे नॉर्मल नाही असं तुम्हाला वाटतं. दुसरी मुलं मला याची जाणीव करुन द्यायचे. त्यांना हे माहित नव्हतं की ते काय करत आहेत. ते मुर्खपणा करत होते आणि तुम्हाला वाटतं की माझं आयुष्य संपलंय.'