Satish Kaushik passes away: सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आणणारे प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सतीश कौशिक (satish Kaushik passes away) यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश कौशिक (satish Kaushik ) यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सतीश कौशिक यांच्या अचानक जाण्याने त्यांचे कुटुंबीय, चाहते आणि सर्व सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला आहे. हे ज्येष्ठ कलाकार आता आपल्यात नाहीत, यावरही अनेकांना विश्वास बसत नाही. अभिनेते अनुपम खेर यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे.
मला माहितय, "मृत्यू हे जगाचे अंतिम सत्य आहे! पण मी माझ्या जिवलग मित्र #SatishKaushik बद्दल असे लिहावे लागेल, हे स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं. 45 वर्षांच्या मैत्रीचा असा अचानक अंत झाला, सतिश, तुझ्याशिवाय आयुष्य पहिल्यासारखं नक्कीच राहणार नाही."
जानता हूँ “मृत्यु ही इस दुनिया का अंतिम सच है!” पर ये बात मैं जीते जी कभी अपने जिगरी दोस्त #SatishKaushik के बारे में लिखूँगा, ये मैंने सपने में भी नहीं सोचा था।45 साल की दोस्ती पर ऐसे अचानक पूर्णविराम !! Life will NEVER be the same without you SATISH ! ओम् शांति! pic.twitter.com/WC5Yutwvqc
— Anupam Kher (@AnupamPKher) March 8, 2023
सतीश कौशिक यांनी मुंबईत येऊन अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून खास ओळख निर्माण केली. मात्र प्रत्यक्षात सतीश कौशिक (satish Kaushik ) हरियाणाचे मूळचे रहिवासी होते. सतीश कौशिक यांचा जन्म 13 एप्रिल 1956 रोजी हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यात झाला. त्यांनी हरियाणा आणि दिल्लीतून शिक्षण घेतले. 1972 मध्ये त्यांनी दिल्लीच्या किरोरी माल कॉलेजमधून पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी FTII (Film and Television Institute of India) मधून अभिनयाचे शिक्षण घेतले.
वाचा: पेट्रोल-डिझेलने दिला मोठा धक्का, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
सतीश कौशिक यांनी 1983 मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात मासूम या चित्रपटातून केली होती. या चित्रपटाद्वारे त्याने अभिनयाच्या विश्वातही पाऊल ठेवले. यानंतर त्यांनी 'रूप की रानी चोरों का राजा' या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. दिग्दर्शन आणि अभिनयासोबतच त्यांनी पडद्यावर कॉमेडी करूनही लोकांची मने जिंकली. 'राम-लखन' आणि 'साजन चले ससुराल' या चित्रपटांसाठी त्यांना दोनदा सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकाराचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
सतीश कौशिक (satish Kaushik) यांचे शशी कौशिक यांच्याशी 1985 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर अनेक वर्षांनी त्यांच्या घरी मुलगा झाला. पण, चित्रपटाच्या पडद्यावर लोकांना हसवणाऱ्या सतीश कौशिकच्या आयुष्यात एक अपघात घडला, ज्याने त्यांना चांगलेच तोडले. 1996 मध्ये त्यांच्या 2 वर्षाच्या मुलाचे निधन झाले होते. आपल्या मुलाच्या मृत्यूने त्यांना खूप मोठा धक्का बसला होता, ज्यातून बाहेर यायला त्यांना बराच वेळ लागला.
2012 मध्ये मुलाच्या मृत्यूनंतर 16 वर्षांनी त्यांच्या घरात पुन्हा रडण्याचा आवाज आला. सरोगसीच्या मदतीने त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला. मुलीच्या जन्माने त्यांच्या घरात पुन्हा एकदा आनंदाचे आगमन झाले.
सतीश कौशिक यांची फिल्मी कारकीर्द खूपच नेत्रदीपक राहिली आहे. अभिनेता आणि दिग्दर्शकाव्यतिरिक्त त्यांनी कॉमेडियन आणि पटकथा लेखक म्हणूनही काम केले. दीवाना मस्ताना आणि मिस्टर इंडिया या चित्रपटांतील त्याच्या पात्रांना चाहते आजपर्यंत विसरू शकलेले नाहीत. जाने भी दो यारों, कागज, स्वर्ग, जमाई राजा, साजन चले ससुराल, मिस्टर अॅण्ड मिसेस खिलाडी या चित्रपटांसह त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली. अभिनयासोबतच त्यांनी 'हम आपके दिल में रहते हैं', 'तेरे नाम', 'शादी से पहले'सह अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. सतीश कौशिक यांच्या निधनाने प्रत्येकजण दु:खी झाला असून ओल्या डोळ्यांनी त्यांची आठवण काढत आहे.