Satish Shah : लंडनमध्ये वर्णभेदाचा सामना केल्यानंतर सतीश शाह यांचं 'गोऱ्या साहेबांना' चोख प्रत्युत्तर; पाहा काय म्हणाले...

Satish Shah on Racist Comment : वर्णभेदाचा सामना करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्यावर परदेशात ओढावला अनपेक्षित प्रसंग. त्यावेळी त्यांनी काय उत्तर दिलं माहितीये? 

Updated: Jan 4, 2023, 12:34 PM IST
Satish Shah : लंडनमध्ये वर्णभेदाचा सामना केल्यानंतर सतीश शाह यांचं 'गोऱ्या साहेबांना' चोख प्रत्युत्तर; पाहा काय म्हणाले...  title=
sarabhai vs sarabhai fame Actor Satish Shah faces Racist Comment at london airport

Satish Shah London Airport Incident:​  आज आपण 21 व्या शतकात असलो तरीही काही बाबतीत मात्र अद्यापही आपण पुढे आलेलो नाही याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. आम्ही पुरोगामी विचारांचे, आम्ही मानवी स्वभावाचा पुरस्कार न करणाऱ्या रुढींचा विरोध करणारे वगैरे वगैरे म्हणत आव आणण्यांचा खरा चेहरा यानिमित्तानं पुन्हा एकदा समोर आला आहे. 'साराभाई व्हर्सेस साराभाई' (Sarabhai vs Sarabhai) फेम सतीश शाह  (Satish Shah) यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळं भारतीयांविषयी आजही परदेशात नेमकी काय विचारसरणी आहे हे उघड झालं आहे. 

ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांनी (london) लंडनमधील हिथ्रो विमानतळावर आपल्यासोबत घडलेल्या एका अनपेक्षित आणि तितक्याच संतापजनक प्रसंगाबाबत ट्विट करत माहिती दिली. हल्लीच शाह फर्स्ट क्लासमधून लंडनचा प्रवास करत होते. त्याचवेळी त्यांनी जे काही ऐकलं ते पाहता एक भारती म्हणून त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. पण, प्रसंगाचं भान राखत त्यांनी चक्क 'इंद्रवर्धन' स्टाईलमध्ये या परदेशी साहेबांना उत्तर दिलं. 

विमानतळावर नेमकं काय घडलं?

शाह यांनी ट्विट करत विमानतळावरील प्रसंग शब्दांत मांडला. त्यांचं हे ट्विट वाचल्यानंतर अनेकांनीच तो प्रसंग डोळ्यांपुढे उभा केला. शाह यांनी लिहिलं, 'मी त्यांना अतिशय अभिमानानं हसत उत्तर दिलं, ...कारण आम्ही भारतीय आहोत. हे मी त्यावेळी म्हटलं जेव्हा Heathrow विमानतळावरील कर्मचारी त्याच्या सहकर्मचाऱ्याला विचारत होते, यांना फर्स्ट क्लासनं प्रवास परवडतो तरी कसा?'

हेसुद्धा वाचा : सेलिब्रिटी कुटुंबातील बालकलाकारावर अत्याचार, नंतर पट्ट्यानं मारहाण; कलाजगताला हादवरणारी घटना

'हम साथ साथ है', 'मैं हूं ना', 'ओम शांति ओम' आणि अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकलेल्या शाह यांनी केलेल्या या ट्विटला 12 हजारांहून अधिक लाईक्स आणि एक हजारांहून अधिक रिट्विट्स मिळाले आहेत. इथं गंमत म्हणजे शाह यांनी केलेल्या या ट्विटवर Heathrow विमानतळाच्या अकाऊंटवरूनही प्रतिक्रिया देण्यात आली आहे. 

'सुप्रभात... आम्ही घडलेल्या या प्रसंगासाठी आपली क्षमा मागतो. तुम्ही आम्हाला मेसेज करु शकता का?'

बस्स, मग काय आता खुद्द 'गोरे साहेब'च शाह यांच्यापुढे नमले म्हटल्यावर ट्विटरवर या विषयावरून बऱ्याच चर्चा झाल्या. अनेकांनीच यावर आपली मतं आणि स्वत:सोबत घडलेले अनुभवही सांगण्यास सुरुवात केली. आज काळ इतका पुढे आलेला असतानाही भारतीयांना अशी वागणूक मिळणं ही निराशाजनक बाब आहे हे मात्र खरं.