'त्या' दिवशी असं काय झालं ज्यामुळे Sapna Choudhary अडकली कायद्याच्या कचाट्यात

Sapna Choudhary सह पाच जणांवर धक्कादायक आरोप! यातून डान्सर सुटेल?   

Updated: Nov 5, 2022, 09:25 AM IST
'त्या' दिवशी असं काय झालं ज्यामुळे Sapna Choudhary अडकली कायद्याच्या कचाट्यात  title=

मुंबई : डान्स म्हटलं की, सपना चौधरी (Sapna Choudhary) हे नाव प्रत्येकाच्या मनात अगदी सहज येतं. लोक तिला देसी क्वीन, डान्सिंग क्वीन म्हणून देखील ओळखतात. हरियाणाची क्वीन सिंगर आणि डान्सर सपना चौधरी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. फोटो असो किंवा व्हिडीओ, तिची प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर लगेच व्हायरल होते. नेहमी आपल्या भन्नाट डान्सने अनेकांना घायाळ करणारी सपना चौधरी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सपनासह जण कायद्याच्या कचाट्यात सापडल्याचं समोर आलं आहे. (sapna choudhary new song)

सपना चौधरींच्या अडचणींमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असल्याचं लक्षात येत आहे. सपना चौधरीवर लावण्यात आलेले फसवणुकीचे आरोप निश्चित केले आहेत. सपना शिवाय जुनैद अहमद, इबाद अली, अमित पांडे, रत्नाकर पांडे यांच्यावर देखील आरोप निश्चित केले आहेत. (loot liya haryana sapna choudhary)
 
मिळालेल्या माहितीनुसार, सपना चौधरीसह पाच आरोपी एसीजेएम कोर्टात हजर झाले होते. यावेळी एसीजेएम कोर्टाने साक्ष सुरू करण्याचे आदेशही फिर्यादीला दिले आहेत. या प्रकरणी सर्व साक्षीदारांना 12 डिसेंबरला बोलावण्यात आलं आहे. (sapna choudhary fraud case)

नक्की काय आहे प्रकरण? 
13 ऑक्टोबर 2018 रोजी हरियाणवी डान्सर सपना चौधरीविरुद्ध लखनऊमधील आशियाना पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

पैसे घेऊनही कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यामुळे सपनावर आरोप आहे. ज्या कार्यक्रमात सपनाला बोलावण्यात आलं होतं, त्या कार्यक्रमाचं तिकिट प्रति व्यक्ती तीनशे रुपये होतं (sapna dance).  पण सपना कार्यक्रमाठी ठरलेल्या वेळेच न पोहोचल्यामुळे तेथे उपस्थित प्रेक्षकांनी एकच गोंधळ घातला.