दगंल फेम अभिनेत्री सान्या मल्होत्राची स्वप्नपूर्ती, चाहत्यांसोबत शेअर केली गुडन्यूज!

Sanya Malhotra New House Gurgaon: 'दगंल' (Dangal Sanya Malhotra) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिनं दिल्लीच्या गुडगाव येथे एक नवं घर विकत घेतलं असून तिनं 4BHK फ्लॅट विकत घेतला असल्याचे समोर आले आहे. सध्या सोशल मीडियावर तिचे हे फोटोज तूफान व्हायरल (Photo Viral) झाले आहेत.

गायत्री हसबनीस | Updated: May 6, 2023, 06:13 PM IST
दगंल फेम अभिनेत्री सान्या मल्होत्राची स्वप्नपूर्ती, चाहत्यांसोबत शेअर केली गुडन्यूज!  title=
सान्या मल्होत्रा इन्टाग्राम

Sanya Malhotra Buy 4BHK: प्रत्येकाच्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे आपलं हक्काचं घर घेणं. सोशल मीडियावर सेलिब्रेटीही आपल्या नव्या घराचे फोटो हे शेअर करतात तेव्हा आपल्यालाही त्यांच्याप्रमाणेच एक घर घेता यावे असं स्वप्नही आपण उराशी बागळून असतो. दंगल गर्ल सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra News) हिनं आपलं स्वप्न पुर्ण केलं आहे. त्यामुळे सध्या तिचे नव्या घराचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सान्या मल्होत्रा हिनं गुडगाव येथे 4BHK फ्लॅट खरेदी केला आहे. यावेळी तिचे गृहप्रवेशाचे फोटो इंटरनेटवर चर्चा रंगली आहे. तिनं डोक्यावर कलश ठेवत गृहप्रवेश केल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. तिच्या घराचे फोटो पाहून तुम्हालाही वाटेल की आपणही सान्याप्रमाणे घर घ्यावं. 

आमिर खानसोबतचा आपला पहिला चित्रपट 'दगंल'नंतर सान्यानं बॉलिवूडमध्ये (Sanya Malhotra Buyes Home) आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 2016 पासून तिनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतर तिनं मागे वळून पाहिलं नाही. तिची पुढील फिल्म 'कटहल' रिलिज होण्याच्या मार्गावर आहे. आपल्या या आगामी चित्रपटाच्या आधी तिनं आपल्या चाहत्यांना एक गूडन्यूज दिली आहे. तिनं दिल्लीच्या गुडगाव येथे 4BHK फ्लॅट खरेदी केला आहे. तिनं आपले हे फोटोज इन्टाग्रामवर शेअर केले आहेत. (sanya malhotra buys 4bhk at gurgaon shares instagram story gurhapravesh in white saree and kalash)

असा केला गृहप्रवेश 

सान्यानं सोशल मीडियावर आपल्या नव्या घराबाबतची आणि गृहप्रवेशाबाबत माहिती दिली आहे आणि आपले लेटेस्ट फोटो इन्टाग्रामवर शेअर केले आहेत. यावेळी ती पांढऱ्या साडीमध्ये दिसते आहे. तिनं हे फोटोज इन्टाग्रामवर पोस्ट केले आहेत आणि कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, नवं घर! समोर आलेल्या फोटोंमधून कळतंय की, शंकराच्या मुर्तीचा फोटो आहे. त्याचसोबत सान्यानं निळ्या रंगाचा ब्लाऊज आणि पांढऱ्या रंगाच्या साडीचा लुक परिधान करत डोक्यावर कलश घेतला आहे. 

हेही वाचा - वयाच्या 74 वर्षी प्रिन्स चार्ल्स झाले 'King Charles III'; आईच्या आठवणीनं भावुक

नव्या चित्रपटांची रांग 

अभिनेत्री सान्या मल्होत्रा ही दिल्लीत राहते. ती आपल्या 'कटहल' (Kathal) या चित्रपटाच्या प्रमोशनध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचा ट्रेलर हा सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कहाणी ही सत्य घटनेवर आधारित आहे. सान्या मल्होत्रा ही शाहरूख खानच्या 'जवान' या चित्रपटातूनही प्रेक्षकांसमोर येणार आहे. सोबतच विकी कौशलच्या 'सॅम बहादूर'मध्येही दिसणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिनं इन्टाग्राम स्टोरीतून (Sanya Malhotra Instagram Story) तिच्या चाहत्यांनी ही माहिती दिली आहे. तिच्या नव्या घराचे फोटोजही लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळतील अशी आशा आहे.