GK : भारतातील एकमेव जिल्हा पूर्वी एक राज्य म्हणून ओळखला जायचा ! देशातील 9 राज्यांपेक्षा मोठा जिल्हा

Kutch Gujarat :भारतात एक असा जिल्हा आहे जो पूर्वी एक राज्य म्हणून ओळखला जायचा. हा जिल्हा देशातील सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्यासमोपर केरळ, हरियाणा, गोवा, सिक्किम, नागालैंड, त्रिपुरा, मिजोरम, मणिपुर आणि मेघालय ही राज्य लहान वाटतील. जाणून घेऊया हा जिल्हा कोणता?  

वनिता कांबळे | Updated: Feb 2, 2025, 09:15 PM IST
GK : भारतातील एकमेव जिल्हा पूर्वी एक राज्य म्हणून ओळखला जायचा ! देशातील 9 राज्यांपेक्षा मोठा जिल्हा  title=

Largest districts in India : भारतात 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. प्रत्येक राज्य हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यासह भोगौलिक स्थितीमुळे देखील अनेक जिल्ह्यांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. भारतात एक जिल्हा आकारमानाने इतका मोठा आहे आहे की देशातील 9 राज्य याच्यापेक्षा आकारमानाने लहान आहेत. विशेष म्हणजे भारतातील हा जिल्हा पूर्वी एक राज्य म्हणून ओळखला जायचा. जाणून घेऊया भारतातील सर्वात मोठा जिल्हा  कोणता? 

भारतीय राज्यव्यवस्थानुसार, देश राज्यांत तर राज्ये जिल्ह्यांत विभागलेली आहेत. भारतात एकूण 788 जिल्हे आहेत. केंद्रशासित प्रदेश आणि राज्यात गरजेनुसार जिल्हे तयार केले जातात. राज्य सरकार गरज भासल्यास जिल्ह्यांची संख्या वाढवू शकते, म्हणजेच नवीन जिल्ह्यांची निर्मिती करू शकते. भारतातील सर्वात मोठा जिल्हा एकेकाळी देशातील एक राज्य म्हणून ओळखला जायचा. कच्छ असे या जिल्ह्याचे नाव आहे. 

भारतातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचे नाव कच्छ आहे. कच्छ जिल्हा गुजरात राज्यात आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने कच्छ हा भारतातील सर्वात मोठा जिल्हा असल्याचे सांगितले जाते. गुजरातच्या या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 45,674 चौरस किलोमीटर आहे. म्हणजेच गुजरात राज्याच्या 23.7 टक्के भाग या जिल्ह्याने व्यापलेला आहे. या जिल्ह्याचा निम्म्याहून अधिक भागात वाळवंट आहे. कच्छ मधील वाळवंट हे गुजरातमध्ये येणाऱ्या  पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. या जिल्ह्यासमोर  केरळ, हरियाणा, गोवा, सिक्किम, नागालैंड, त्रिपुरा, मिजोरम, मणिपुर आणि मेघालय ही राज्य  कच्छ जिल्ह्यासमोर लहान वाटतील. 

एकेकाळी भारतात कच्छ नावाचे राज्य होते.  1950 पासून आहे जेव्हा कच्छ राज्य म्हणून प्रचलित होते तेव्हा 1 नोव्हेंबर 1956 रोजी हा परिसर मुंबई राज्याला जोडण्यात आला. त्यावेळी मराठी आणि गुजराती लोक तिथे राहत असत. त्यात मारवाडी लोकांचीही संख्या होती. त्यानंतर 1960 मध्ये भाषेच्या आधारावर मुंबई राज्याचे विभाजन करून महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन नवीन राज्ये निर्माण झाली. अशा प्रकारे कच्छ जिल्हा नंतर गुजरातमध्ये आला. एकेकाळी कच्छमध्ये झालेल्या भीषण भूकंपाने हा जिल्हा उद्ध्वस्त झाला.