India Vs England 5th T20: डावखुरा फलंदाज अभिषेक शर्माचा शतकाच्या जोरावर भारताने पाचव्या T20 मालिकेतील शेवटचा सामना काबीज केलाय. भारताने यासह मालिका 4-1 ने खिशात घातलाय. पाच मालिकेच्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पाचवा टी-20 सामना भारताने गोड केलाय. या सामन्यात भारताने इंग्लंडचा धावांनी पराभव करुन मालिकेतील मालिका आपल्या खिशात घातलाय. अभिषेक शर्माच्या आक्रमक खेळीमुळे भारताने 20 षटकांत 9 गडी गमावून 247 रन्स केले होते.
टीम इंडियाने टी-20 मालिकेतील पाचव्या सामन्यात इंग्लंडचा 150 धावांनी पराभव केला.इंग्लंडचा संघ अवघ्या 97 धावांवर ऑलआऊट झाला. भारताकडून अभिषेक शर्माने 135 धावांची खेळी केली. त्याने 2 विकेट्सही घेतल्या. त्यामुळे अभिषेक शर्माचा इतिहासिक खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार सन्मानित करण्यात आलं. इंग्लंडकडून फिलिप सॉल्टने अर्धशतक झळकावले.
डावखुरा फलंदाज अभिषेक शर्माने तडाखेबंद शतकमुळे क्रिकेटप्रेमींचा रविवार सुट्टीचा दिवस आनंददायी झाला. अभिषेक शर्माने 37 चेंडूत शतकी खेळी पाहून मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये अभिषेक शर्माचे वादळ घोंघावताना पाहिला मिळालं. इंग्लंडच्या एकाही गोलंदाजांना मैदानात अभिषेकने सेट होऊ दिलं नाही. 118 व्या ओव्हरमध्ये शर्मा बाद झाला आणि त्याने 54 चेंडूत 135 धावांपर्यंत पोहोचू शकला.
अभिषेक शर्माने केवळ 37 चेंडूत आपलं शतक पूर्ण करुन भारताला दमदार स्थितीत आणलं. 37 चेंडूत 5 चौकार आणि 10 षटकार लगावले. अभिषेक शर्माने हे दुसरं जबरदस्त शतक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे सर्वात तिसरे वेगवान शतक असून यापूर्वी रोहित शर्मा आणि डेव्हिड मिलर यांनी याप्रकारे शतक ठोकलंय. भारताच्या संघासाठी पॉवरप्ले अत्यंत चांगला गेला. भारतीय संघाने 1 विकेट गमावून 95 धावा केल्या. तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांच्यात भागीदारी झाल्याचे पाहिला मिळालं. अभिषेक शर्माने 17 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. वेगवान अर्धशतक ठोकणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमाकांवर आलाय.