Sacred Games : बोल्ड सीन देऊन 'ही' अभिनेत्री चांगलीच फसली

काय आहे हा  प्रकार?

Sacred Games : बोल्ड सीन देऊन 'ही' अभिनेत्री चांगलीच फसली

मुंबई :'सेक्रेड गेम्स' या सिरीजने नेटफ्लिक्सवर आल्यावर धुमाकूळ घातला आहे. 'सेक्रेड गेम्स' ही पहिली भारतीय वेब सिरीज आहे जी नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. 'सेक्रेड गेम्स'मध्ये महत्वाची भूमिका साकारलेल्या राजश्री देशपांडेने जबरदस्त बोल्ड सीन दिले आहेत. मात्र आता ती खूप मोठ्या संकटात अडकली आहे. याबाबतचा खुलासा नुकताच राजश्रीने एका मुलाखतीत दिला आहे. 

6 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर 'सेक्रेड गेम्स' ही वेबसिरीज सुरू झाली. या सिरीजला अगदी सुरूवातीपासूनच खूप चांगली पसंती मिळाली. या वेब सिरीजमध्ये राजश्रीने नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत अनेक बोल्ड सीन आहेत. ज्यामुळे आता तिला खूप अश्लिल मॅसेजेसना सामोरे जावे लागत आहे. स्पॉट बॉयला दिलेल्या मुलाखतीमध्ये 'ब्लाऊजचे बटन खोलून हे सगळं असं करण माझ्यासाठी खूप कठीण होतं' मला थोडा अंदाज होता की, माझे हे सीन व्हॉट्सअॅपवर व्हायरल होतील. मी बऱ्याचप्रमाणात याकडे दुर्लक्ष केलं. मात्र आता हे व्हिडिओ पॉर्न साईटवर जात असून लोकं मला पॉर्न स्टार समजत आहेत. हे पण वाचा : Sacred Games : दुसऱ्या सिझनमध्ये असणार हे कलाकार

 

सोबतच राजश्रीने सांगितलं की, काही कमेंट्स खूप खराब असतात. मला अनुराग कश्यपवर पूर्ण विश्वास आहे. राजश्री म्हणाली की ही पहिली वेळ नाही की अशा प्रसंगाना मला सामोरे जावे लागते. अनुराग कश्यपने सांगितले होते की, जर तुला या सीनबाबत कोणतीची अडचण असेल तर मला तात्काळ सांग. काही दिवसांपूर्वी 'सेक्सी दुर्गा' नाव असलेल्या मल्याळम सिनेमाची 'न्यूड' सिनेमासोबत खूप चर्चा झाली. इफ्फीला या सिनेमांना नाकारण्यात आलं. त्यानंतर 'सेक्सी दुर्गा' या सिनेमाच नाव 'एस दुर्गा' ठेवण्यात आलं. यानंतर मला जीवे मारण्याची धमकी देखील मिळाली. लोकं माझ्या चेहऱ्यावर अॅसिड फेकू अशी मागणी करू लागले. हे पण वाचा : Sacred Games : 'हा' न्यूड सीन 7 वेळा केला शूट