मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा 'भारत' बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सलमान त्याचे चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित करतो. यंदाही 'भारत' ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आला. आता संजय लीला भंन्साळी दिग्दर्शित 'इंशाअल्लाह' चित्रपट २०२० मध्ये ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. त्याच दिवशी अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' चित्रपटाची तारिखही नक्की करण्यात आली. त्यामुळे पुढच्या वर्षी ईदच्या दिवशी दोन चित्रपट प्रदर्शित होणार होते. परंतु आता बॉक्स ऑफिसवर क्लॅशपासून वाचण्यासाठी दिग्दर्शक रोहित शेट्टीने 'सूर्यवंशी' चित्रपटाची तारिख बदलली आहे.
रुपेरी पडद्यावर दोन मोठ्या कलाकारांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाल्याने दोन्ही चित्रपटांना नुकसान होते. सलमान खान त्याचे मोठे चित्रपट नेहमीच ईदच्या दिवशी प्रदर्शित करतो. त्यामुळे रोहित शेट्टीने आपल्या 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख बदलली आहे. रोहितच्या या निर्णयावर सलमानने रोहितचे आभार मानले आहेत.
सलमानने रोहित सोबतचा एक फोटो शेअर करत 'मी नेहमीच रोहितला माझा लहान भाऊ मानलं आहे आणि आज त्याने ते सिद्ध केलं आहे. सूर्यवंशी २७ मार्च २०२० रोजी पर्दर्शित होणार आहे' असं कॅप्शन सलमानने दिलं आहे.
I always thought of him as my younger brother and today he proves it... #RohitShetty
Sooryavanshi releasing on 27th March, 2020. pic.twitter.com/KGHsej3Bow
— Salman Khan (@BeingSalmanKhan) June 12, 2019
चित्रपट निर्माता करण जोहरने सलमान आणि रोहितचा फोटो शेअर करत 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या तारखेची घोषणा केली आहे.
'इंशाअल्लाह' चित्रपटातून सलमान खान आणि आलिया भट्ट ही जोडी पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. तर दुसरीकडे 'सूर्यवंशी'मध्ये अक्षय कुमार, कतरिना कैफ अनेक वर्षांनंतर एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.