मुंबई : रोहित शेट्टी दिग्दर्शक सिनेमा सूर्यवंशीची सध्या जोरदार चर्चा आहे. लॉकडाऊननंतर आता कुठे थिएटर सुरू झालेत. यानंतर बॉलिवूडमधील रोहित शेट्टीचा 'सूर्यवंशी' हा पहिला सिनेमा थिएटरमध्ये झळकला. हा सिनेमा अगदी रिलिज झाल्यापासून चर्चेत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्येही बाजी मारली आहे. मात्र या दरम्यान एका सीनमध्ये खूप मोठी चूक आढळून आली आहे. यामुळे सूर्यवंशी सिनेमा आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी दोघंही सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत.
एका युझरने म्हटलंय की,'सिंबा (Simmba) सिनेमात जो खलनायकाचा भाऊ बनला आहे. तोच सूर्यवंशी सिनेमात एँटी टेरिझम स्क्वाड ऑफिसर बनला आहे. आणि हे पुन्हा एवेंजर्स सारखे युनिवर्स बनवणार आहेत.' यासोबतच लिहिलं आहे, RIP लॉजिक
RIP Logic .
Simmba mein Villain ka Bhai aur Sooryavanshi mein Anti terrorism squad officer .
And they all are going to make Avengers Type Universe #AjayDevgn #AkshayKumar #RanveerSingh #KatrinaKaif #RohitShetty pic.twitter.com/Rx0V89pnBp— AJ Power (@AJPower467) November 6, 2021
RIP Logic .
Simmba mein Villain ka Bhai aur Sooryavanshi mein Anti terrorism squad officer .
And they all are going to make Avengers Type Universe#AjayDevgn #AkshayKumar #RanveerSingh #KatrinaKaif #RohitShetty pic.twitter.com/Rx0V89pnBp— AJ Power (@AJPower467) November 6, 2021
RIP Logic .
Simmba mein Villain ka Bhai aur Sooryavanshi mein Anti terrorism squad officer .
And they all are going to make Avengers Type Universe #AjayDevgn #AkshayKumar #RanveerSingh #KatrinaKaif #RohitShetty pic.twitter.com/Rx0V89pnBp— AJ Power (@AJPower467) November 6, 2021
दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यासारखी महत्त्वाची आणि जबाबदार व्यक्तिरेखा साकारणाऱ्या सूर्यवंशीमध्ये तो महत्वाचा आहे. असं असताना तो रणवीर सिंगच्या सिम्बा चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या सोनू सूदचा भाऊ बनला होता. पूर्वी खलनायक बनलेली व्यक्ती दुसऱ्या चित्रपटात अधिकारी का झाली? हे चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे.
चित्रपटाचा आणखी एक सीन खूप ट्रोल होत आहे ज्यामध्ये अक्षय कुमार छतावरून खाली उडी मारताना दिसत आहे. हा सीन सलमान खानच्या 'एक था टायगर' या चित्रपटाची कॉपी असल्याचे सांगितले जात आहे. एक था टायगर या चित्रपटातही सलमान अशीच अॅक्शन करताना दिसला होता. त्यामुळे रोहित शेट्टी आणि अक्षय कुमार यांना ट्रोल केले जात आहे.
Akki Has Copied
Neck To Neck Action Sequence Stunts From #SalmanKhan Ek Tha Tiger In His Latest Release Sooryavanshi Movie pic.twitter.com/J7daA6f4Kf— (@BeingHBK10) November 6, 2021
काही दृश्यांमुळे हा चित्रपट ट्रोल होत असला तरी या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली असून 3 दिवसात चित्रपटाने 75 कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट पाहून टाळ्यांचा कडकडाट होत आहे. या चित्रपटातील अक्षय आणि कतरिनाची केमिस्ट्रीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. रणवीर सिंग आणि अजय देवगणचा कॅमिओही खूपच मजेशीर आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत असलेल्या चाहत्यांच्या अपेक्षांवर हा चित्रपट खरा ठरला आहे.