रितेशने भर रस्त्यात पत्नीला केलं Kiss, व्हिडिओ व्हायरल

रितेशचा पत्नीसोबतचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. 

Updated: Jan 29, 2022, 07:27 PM IST
रितेशने भर रस्त्यात पत्नीला केलं Kiss, व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : रितेशचा पत्नीसोबतचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. रितेशने भर रस्त्यात पत्नीला किस केले आहे. हा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

बिग बॉस 15 च्या फिनालेमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचलेली अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंतने पती रितेशसोबत बिग बॉस 15 च्या फिनालेमध्ये प्रवेश केला आहे. मात्र याआधी अभिनेत्रीने मीडियासमोर पतीला खुलेआम किस केले आहे. अभिनेत्री राखी सावंतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 

राखी सावंतने व्हॅनिटी व्हॅनमध्ये डान्स केला. बिग बॉस 15 च्या फिनाले एपिसोडमध्ये डान्स करताना अभिनेत्री राखी सावंत व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर पडली.यावेळी तिच्यासोबत अभिनेत्री राखी सावंतचा पती रितेशही उपस्थित होता.

जो आपल्या पत्नीसोबत मॅचिंग कलरच्या कपड्यांमध्ये पोहोचला होता. यादरम्यान कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंतने रस्त्याच्या मधोमध मीडिया कर्मचाऱ्यांसमोर विचित्र पोज दिली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यादरम्यान अभिनेत्री राखी सावंत आपल्या नवऱ्याचे लाड करताना दिसली. राखी सावंतचे हे फोटो तिच्या आणि मिका सिंगच्या वादग्रस्त लिप किस प्रकरणाची आठवण करून देणारी असल्याचं बोललं जात आहे.