THROWBACK: ऋषी कपूर यांची Coca Cola सोबत खास आठवण

जुन्या आठवणींना उजाळा 

Updated: Nov 14, 2019, 11:51 AM IST
THROWBACK: ऋषी कपूर यांची Coca Cola सोबत खास आठवण

मुंबई : जगभरात बालदिन साजरा होत असताना बॉलिवूड कलाकार तरी कसे मागे राहतील. दिग्गज अभिनेता ऋषी कपूर यांच्या ट्विटने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ऋषी कपूर यांनी बॉलिवूडच्या दिग्गज मंडळीची बालपणीची एक आठवण शेअर केली आहे. 

#THROWBACK मध्ये आपण कलाकार मंडळींचे अनेक जुने फोटो पाहिले आहेत. मात्र हा फोटो थोडा खास आहे. या फोटोत बॉलिवूडचे अभिनेता, दिग्दर्शक यांच बालपण दडलेलं आहे. या फोटोत कपूर कुटुंबातील अनेक सुपरस्टारच्या बालपण तर आहेच सोबत अभिनेत्री नर्गिस आणि राज कपूर देखील दिसत आहेत. 

ऋषी कपूर यांनी बुधवारी रात्री उशिरा एक ब्लॅक ऍण्ड व्हाइट फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये अनेक मुलं कोका कोलाची बॉटल घेऊन आहेत. ही लहान मुलं दुसरे तिसरे कुणी नसून आताचे दिग्गज कलाकार आहेत ऋषी कपूर, बोनी कपूर आणि अनिल कपूर आहेत. 

ऋषी कपूर यांनी सांगितलं की,'हा फोटो सामान्य नसून कोका-कोलाच्या जाहिरातीमधील खरा फोटो आहे.'या फोटोवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या कमेंट्स आहेत. 

ऋषी कपूर यांनी आणखी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोने लोकांना आणखी मोठा धक्का बसला आहे. हा फोटो एक सुपरस्टार जोडी असून यामध्ये राज कपूर आणि नर्गिस कोका-कोलाच्या जाहिरातीचा फोटो आहे. 'कोका-कोलासोबत आणखी एक पिढी (जनरेशन)'. 

आज जागतिक बालदिन या दिनानिमित्त ऋषी कपूर यांनी हे दोन फोटो शेअर केले आहेत. जुन्या फोटोंसोबत जुन्या आठवणींना देखील उजाळा मिळाला आहे. ऋषी कपूर सध्या आपल्या आजारावर उपचार घेत आहेत.