पार्टनरच्या निधनामुळं एकट्या पडल्या 'या' अभिनेत्री, इतकं वाईट कोणासोबतच घडायला नको

हे दु:ख शब्दांतही मांडता येणार नाही, इतकं मोठं... 

Updated: Aug 24, 2022, 10:44 AM IST
पार्टनरच्या निधनामुळं एकट्या पडल्या 'या' अभिनेत्री, इतकं वाईट कोणासोबतच घडायला नको  title=
Rhea Chakraborty Shehnaaz Gill mandira bedi left devastated because of partners death

Rhea Chakraborty, Shehnaaz Gill Stars whose Partners Died: कलाजगतामध्ये गेल्या वर्षभरात काही अशा घटना घडल्या ज्यामुळं चाहत्यांच्याही काळजात धस्स झालं. एकाएकी लोकप्रिय सेलिब्रिटींच्या निधनानं फक्त त्यांचे जवळपचे नाही, तर चाहतेही हैराण होते. हक्काचं आणि प्रेमाचं माणूस गमावल्यामुळं सर्वात जास्त कोण खचलं असेल तर ते म्हणजे या सेलिब्रिटींचे पार्टनर. 

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानं संपूर्ण देश हादरला. सुशांतनं आत्महत्या करत आयुष्य संपवलं आणि त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती या घटनेमुळं हादरली. रियावर काही गंभीर आरोपही झाले, ज्यामुळं तिला कारावासातही दिवस काढावे लागले. हा संपूर्ण काळ तिच्यासाठी कठीण होता. (Sushant singh rajput)

Bigg Boss या रिअॅलिटी शोमुळं चर्चेत असणाऱ्या शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला, या जोडीच्या नात्याचा शेवटही वाईट झाला. सिडच्या अकाली एक्झिटनं शहनाज खचली. आता कुठे ती या आघातातून सावरताना दिसत आहे. (Siddharth shukla)

सर्वकाही सुरळीत सुरु असतानाच एके दिवशी अभिनत्री मंदिरा बेदीचे पती, राज कौशल यांचं निधन झालं. दोन मुलं पदरात असणाऱ्या मंदिरानं पतीला गमावलं, तरीही ती लेकरांसाठी पुन्हा मोठ्या धीरानं उभी राहिली. (Mandira bedi raj kaushal)

अभिनेत्रींप्रमाणेच एक लोकप्रिय निर्माते- दिग्दर्शकही जोडीदाराच्या निधनाने खचले. अभिनेत्री श्रीदेवी यांची एक्झिट कपूर कुटुंबीयांसाठी मोठा आव्हानाचा काळ ठरली. हसत्याखेळत्या कुटुंबातून श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी पचवणं अनेकांना कठीण गेलं. पण, त्यांचे पती बोनी कपूर यांनी मात्र परिस्थितीतून सावरत पुन्हा आयुष्याची गाडी रुळावर आणली. (Sridevi)