'8-9 वर्षांपूर्वी मी...', प्लास्टिक सर्जरीच्या दाव्यावर राजकुमार रावची प्रतिक्रिया

Rajkumar Rao on Viral Photo : राजकुमार रावचा काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या फोटोवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यानं प्लास्टिक सर्जरी केल्याचं म्हटलं होतं. त्यावर आता राजकुमार रावनं प्रतिक्रिया दिली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 20, 2024, 04:00 PM IST
'8-9 वर्षांपूर्वी मी...', प्लास्टिक सर्जरीच्या दाव्यावर राजकुमार रावची प्रतिक्रिया title=
(Photo Credit : Social Media)

Rajkumar Rao on Viral Photo : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या एका व्हायरल फोटोमुळे चर्चेत आला होता. त्या फोटोला पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दावा केला की राजकुमार रावनं प्लास्टिक सर्जरी केली. कारण त्यात त्याची हनुवटी ही लांब दिसत होती. त्याचा तो फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याची तुलना ही फायटरमध्ये दिसलेला खलनायक ऋषभ साहवनीशी केली होती. त्या दोघांमध्ये तुलना सुरु झाली होती. आता यावर राजकुमार रावनं प्रतिक्रिया दिली आहे. आता राजकुमार रावनं सत्य काही आहे याविषयी खुलासा केला आहे. 

'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत राजकुमार रावनं सांगितलं की "जर तुम्ही तो फोटो नीट पाहिला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की तो माझ्यासारखा मुळीच नाही. खरंतर हा सगळ्यात मोठा विनोद होता. कारण त्यात मी नाही, मला वाटतं की कोणी तरी प्रॅंक केला आहे. मी हे विश्वासानं सांगू शकतो की कोणी तरी या फोटोशी छेडछाड केली आहे. हा फोटो खोटा आहे."

राजकुमारनं पुढे सांगितलं की "लोकं प्लास्टिक सर्जरी सारख्या मोठ्या शब्दांचा वापर करत होते, पण मी असं काही केलं नाही. दरम्यान, राजकुमार रावनं फिलर्स केले आहेत. मात्र, ते देखील त्यानं अनेक वर्षांपूर्वी केले. ते देखील त्यानं स्वत: चा आत्मविश्वास वाढवण्यासाठी. जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये सुरुवात केली होती, तेव्हा लोकं माझ्या लूक्सवर कमेंट करायचे. तर 8-9 वर्षांपूर्वी मी फिलर्स केले होते. मी चांगला दिसण्यासाठी आणि कॉन्फिडन्ट वाटून घेण्यासाठी हे केलं होतं. ज्यामुळे माझा चेहरा हा एकसारखा नीट दिसला असता. हे सगळं मी डर्मेटिलॉजिस्ट म्हणजेच त्वचेच्या डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर केलं होतं. माझं मत आहे की जर कोणाला हे आत्मविश्वास वाढवण्यासाठी करायचं असेल तर का कोणी करु नये, त्यात चूक काय?" 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : एआर रहमानला 'ज्या' गाण्यासाठी ऑस्कर मिळाला ते गाणं त्याचं नव्हतंच! रामगोपाल वर्माचा दावा

व्हायरल होत असलेल्या फोटोमुळे राजकुमार राववर काय परिणाम झाला, यावर राजकुमार राव म्हणाला, ट्रोलर्सचा काही परिणाम होत नाही कारण हा प्रॅंक आहे. मला माहित आहे की हे खोटं आहे. त्याशिवाय असे देखील ट्रोल आहेत, जे फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी असं काही करतात. जो कोणी करतं,  ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे, असं मला वाटतं. दरम्यान, राजकुमार रावनं पुढे सांगितलं की त्यांच्यावर कायम दबाव टाकण्यात येतो की त्यांनी चांगलं दिसायला हवं.