थायलंडमध्ये अभिनेत्री Priya Prakash Varrier ने केलं बोल्ड फोटोशूट; चाहते घायाळ

प्रिया प्रकाश वारियरचे रोज नवनवीन लूक समोर येत आहेत

Updated: Oct 6, 2022, 02:18 PM IST
थायलंडमध्ये अभिनेत्री Priya Prakash Varrier ने केलं  बोल्ड फोटोशूट; चाहते घायाळ title=

मुंबई : एक डोळा मारून देशभरात प्रसिद्ध असलेल्या प्रिया प्रकाश वारियरचे रोज नवनवीन लूक समोर येत आहेत. प्रिया काळासोबत खूप बोल्ड होत आहे. प्रिया प्रकाशचा एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये ती तिची बोल्ड स्टाईल दाखवताना दिसत आहे. होय, आजकाल प्रिया प्रकाश वारियर थायलंडमध्ये आहे आणि तिथून तिने स्वतःचा एक अतिशय बोल्ड फोटो शेअर केला आहे. ज्याला पाहून तिचे चाहते खूप उत्साहित झाले आहेत.

विंक गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रिया प्रकाश वारियरला आज कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. अर्थात तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं नसेल, पण साऊथ इंडस्ट्रीतील ती एक नावाजलेलं नाव आहे आणि तिच्या विंक व्हिडिओंमुळे ती देशभर प्रसिद्ध झाली आहे.

प्रिया प्रकाशचे चाहते तिच्या एका झलकसाठी वेडे आहेत. अशा परिस्थितीत अभिनेत्रीचा प्रत्येक व्हिडिओ आणि पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मात्र, प्रिया तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. यावेळी अभिनेत्रीने तिच्या बोल्ड अवताराने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.  किंवा असं म्हणायला हवं की काही काळात अभिनेत्री खूप बोल्ड झाली आहे.

निळ्या बिकिनीमध्ये दिसली
आता ताज्या फोटोत प्रियाला पाहताच ती वेकेशनला बाहेर पडल्याचं दिसतंय. यादरम्यान ती सतत तिचे फोटो शेअर करत असते. ताज्या फोटोंमध्ये अभिनेत्री एका बोटवर बसलेली दिसत आहे. येथे तिने ब्रॅलेट आणि बिकीनी घातली आहे. यादरम्यान अभिनेत्रीने आपले केस ओपन ठेवले आहेत. त्याचबरोबर, दुसऱ्या फोटोत प्रिया समुद्रकाठी दिसत आहे. दोन्ही फोटोंमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये दिसली आहे
विशेष म्हणजे प्रिया प्रकाश वरियरने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण विंक व्हिडीओमुळे तिला देशभरात ओळख मिळाली. या व्हिडिओमुळे ती नॅशनल क्रश झाली. आजच्या काळात प्रियाचे इंस्टाग्रामवर जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहेत.