'अनोळखी महिला आली अन् माझ्या मुलीला जबरदस्ती...', Preity Zinta नं सांगितले दोन धक्कादायक अनुभव

Preity Zinta On Viral Video And Her Childrens : प्रीती झिंटानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिला एका आठवड्यात आलेले दोन धक्कादायक अनुभव सांगितले आहेत. काही दिवसांपूर्वी प्रीति एका दिदिव्यांग व्यक्तीच्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली होती. त्यावर देखील प्रीतिनं तिची बाजू मांडली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 9, 2023, 11:41 AM IST
'अनोळखी महिला आली अन् माझ्या मुलीला जबरदस्ती...', Preity Zinta नं सांगितले दोन धक्कादायक अनुभव  title=
(Photo Credit : Preity Zinta Instagram)

Preity Zinta On Viral Video And Her Childrens : बॉलिवूड अभिनेत्री प्रीति झिंटा (Preity Zinta) काही दिवसांपूर्वी तिच्या एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे चर्चेत आली होती. या व्हिडीओत प्रीतिच्या गाडीच्या मागे एक दिव्यांग व्यक्ती रागात तिचा पाठलाग करत असल्याचे आपण पाहिले होते. त्यावरून सोशल मीडियावर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. दरम्यान, आता या सगळ्या प्रकरणावर प्रीतिनं एक पोस्ट शेअर करत त्या व्हिडीओची दुसरी बाजू सांगितली आहे. त्यासोबत प्रीति पापाराझींवर देखील संतापली आहे. 

प्रीतिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ विरल भयानी या सेलिब्रिटी फोटोग्राफरचा आहे. या व्हिडीओत ते संपूर्ण दृष्य दिसत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ शेअर करत प्रीतिनं काही दिवसात तिच्यासोबत झालेल्या दोन घटनांनविषयी सांगितलं आहे. सगळ्यात आधी प्रीति म्हणाली, 'या आठवड्यात माझ्यासोबत दोन अशा गोष्टी घडल्या ज्यामुळे मी खूप घाबरले होते. पहिली घटना ही तिच्या मुलीच्या संबंधीत होते. एक अनोळखी महिला आली फोटो काढण्याचा प्रयत्न केला. आम्ही प्रेमाणे असं करू नका असं सांगितल्यानंतर ती तिथून निघून गेली. त्यानंतर ती अचानक आली आणि तिनं माझ्या मुलीला घट्ट पकडलं आणि तिच्या ओठांच्या अगदी जवळ ओली किस करून म्हणाली खूप गोंडस बाळ आहे आणि निघून गेली. ही बाई एका उच्चभ्रू सोसायटीत राहत होती आणि तिथल्याच गार्डनमध्ये माझी मुलं खेळत होती. जर मी सेलिब्रिटी नसते तर मी यावर खूप वाईट अशी प्रतिक्रिया दिली असती, पण मी शांत राहिले कारण मला त्यावरून वाद वाढवायचा नव्हता.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्रीति झिंटा पुढे त्या दिव्यांग व्यक्तीसोबत घडलेल्या घटनेवर म्हणाली, 'मला फ्लाईट पकडायची होती. त्यावेळी ती दिव्यांग व्यक्ती मला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. गेल्या अनेक वर्षांपासून ती व्यक्ती मला पैशांसाठी सतावते. जेव्हा माझ्याकडे असायचे तेव्हा मी दिले पण आता माझ्याकडे फक्त कार्ड होते. यावेळी त्यानं पैशा मागताच मी त्याची माफी मागितली आणि म्हणाले की माझ्याकडे पैसे नाहीत. माझ्यासोबत जी महिला होती तिनं मग त्याला पैसे दिले. मात्र, त्यानं ते पैसे फेकले कारण त्याला ते कमी वाटत होते. त्यानंतर रागाच्या भरात तो माझा पाठलाग करू लागला.' 

पुढे फोटोग्राफर्सवर संतापत प्रीति झिंटा म्हणाली, 'आम्ही त्या व्यक्तीला मदत केली, त्यानंतर त्यानं असं करणं फोटोग्राफर्सला गंमतीचं वाटलं आणि त्यांनी व्हिडीओ शूट केला. ते लोक त्याला थांबायला बोलले नाही त्यांना वाटलं नाही की अशानं कोणालाही दुखापत होऊ शकते. काही झालं असतं तर मला त्यासाठी दोषी ठरवण्यात आलं असतं. बॉलिवूडला दोष देण्यात आला असता आणि नकारात्मका पसरली असती.' 

हेही वाचा : Amitabh रोमॅंटिक नाहीत, गर्लफ्रेंड असती तर..., Jaya Bachchan यांनी पतीविषयी केला होता मोठा खुलासा

पुढे प्रीति म्हणाली, 'मला असं वाटतं की लोकांना आता जाणीव झाली पाहिजे की आम्ही पहिले एक व्यक्ती आहोत आणि मग सेलिब्रिटी आहोत हे कळायला हवं. मला नेहमीच मला जे यश मिळालं आहे त्यामुळे माफी मागावी लागते. मला या देशात इतरांसारखं जगण्याचा अधिकार हवा आहे. त्यामुळे कधीही कोणाला जज करणं आणि त्याचा कोणत्याही सेलिब्रिटीशी जोडणं बंद करा. कारण प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजु असते. '

प्रीति तिच्या मुलांविषयी बोलताना म्हणाली, 'सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी मुलं ही कोणत्या पॅकेड डीलचा भाग नाही आणि नाही कोणाचा शिकार बनण्यासाठी आहेत. त्यामुळे माझ्या मुलांना एकटं राहु द्या. त्यांच्यासोबत फोटो काढणं किंवा मग त्यांच्या जवळ येऊ नका. ती मुलं आहेत सेलिब्रिटी नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत तसचं वागा. जे फोटोग्राफर्स आमच्याकडून फोटो, व्हिडीओ आणि बाईट मागतात ते इतके समजुतदार किंवा मग माणसूकी आहे की ते अशा प्रकारचे व्हिडीओ शूट करण्याच्या जागी त्यांची मदत करतील. '