गुजरात : संजय लीला भंसाळी यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'पद्मावती'चा ट्रेलर लॉन्च झाला आहे.
ट्रेलर मधूनच या चित्रपटाच्या भव्यतेचा अंदाज येतोय. काही लोकांमध्ये या चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढतेय तर काही जण विरोधात उभे आहेत. चित्रपटाच्या शूटिंगमध्येही काही संघटनांनी विरोध केला होता. आता राजपूत संघटना आणि करणी सेना सिनेमाच्या विरोधात आहेत.
गुजरात येथील सुरतमध्ये एका कलाकाराने 'पद्मावती'मधील दीपिकाचा लूक रांगोळीमध्ये उतरवला होता. यासाठी कलाकाराने तब्बल ४८ तास मेहनत घेतली होती. पण काही लोकांनी नारेबाजी करत ही रांगोळी पायाने पुसून टाकली. याबाबतचा फोटो त्याने ट्विटरवरही शेअर केला आहे.
#padmavati Rangoli Controversy!
A crowd of 100 people cried JAY SRI RAM AND rubbed out my 48hrs' intense work! Shocked!@RanveerOfficial pic.twitter.com/0yWbE7Jqfa— KARAN K. (@KARANK19522136) October 16, 2017
पद्मावती हा सिनेमा १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. करणी सेनेने 'पद्मावती'ला विरोध करत हा चित्रपट आम्हांला दाखवल्याशिवाय रिलीज करू न करण्याचा इशाराही पिव्हीआरला दिला आहे. या चित्रपटामध्ये दीपिका पादुकोण, शाहीद कपूर आणि रणवीर सिंंंग झळकणार आहेत.