'माझी पत्नी ही घरातली पुरुष आहे', Pankaj Tripathi यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर एकच खळबळ

Pankaj Tripathi यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

Updated: Nov 21, 2022, 06:09 PM IST
'माझी पत्नी ही घरातली पुरुष आहे', Pankaj Tripathi यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर एकच खळबळ  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. पंकज यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. (Pankaj Tripathi Love Story) त्यांची लव्ह स्टोरी ही एका चित्रपटाच्या कहाणीसारखी आहे. त्यांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात ही 10 वीत असताना झाली. त्या वयातच त्यांनी प्रेमविवाह करण्याचं ठरवलं होतं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बॉलिवूडमधील त्यांच्या संघर्षाविषयी सांगितलं आहे. (Pankaj Tripathi Wife Mrudula) 

पंकज त्रिपाठी यांनी The Better India ला दिलेल्या मुलाखतीत त्यांची लव्ह स्टोरी सांगितली आहे. वर्षानुवर्षे, सर्व चढ-उतार आणि त्याच्या कारकिर्दीची न संपणारी वाट पाहता पंकज त्रिपाठी यांच्या आयुष्यात जर एक स्थिरता असेल तर त्याचं कारण म्हणजे त्यांची पत्नी मृदुला. 'तुम्ही मला माझ्या संघर्षाबद्दल विचारल्यास, माझ्याकडे फूटपाथवर झोपणं किंवा अनेक दिवस उपाशी राहणं यासारखं काहीही झालं नाही. कारण माझी पत्नी मृदुला हिने घराची संपूर्ण जबाबदारी घेतली होती. खरं तर, मी सर्वांना सांगतो की ती घरची पुरुष आहे. (Pankaj Tripathi Love Story From School)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पंकज त्रिपाठी यांच्या म्हणण्यानुसार, मृदुला १० वीत असताना त्यांची पहिली भेट झाली. तेव्हाच त्यांनी प्रेमविवाह करायचे ठरवले. कारण त्यांच्या गावात हे कोणी केलं नव्हतं. 'माझ्या मनात तिनं घरं बसलं होतं. मी माझ्या आयुष्यात काय करत आहे हे मला माहित नव्हतं. 

हेही वाचा : Ranveer Singh ला रिपोर्टन ओळखलंच नाही; अभिनेत्यानं अशी करुन दिली ओळख, पाहा Video

पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकली 

पंकज त्रिपाठी यांनी 2004 मध्येच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांचा 'रान' पहिला चित्रपट मिळाला होता. यानंतर ते 'ओंकारा'मध्येही दिसले होते. सुरुवातीला, त्यांना एवढं यश मिळालं नाही. परंतु ओटीटी प्लॅटफॉर्मनं त्यांचे नशीब बदलले. मग ते 'मिर्झापूर'चा कलेन भैया असो की 'स्त्री'चा रुद्र असो, किंवा 'क्रिमिनल जस्टिस'चा माधव मिश्रा असो.