मुंबई : बॉलीवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने अलीकडेच तिच्या पतीचे नाव आणि आडनाव 'जोनस' हे तिच्या सोशल मीडियावरून हटवले आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर फक्त तिचं स्वत:चं नाव ठेवलं. त्यानंतर अचानक अशा बातम्या येऊ लागल्या की, या जोडप्याचा घटस्फोट तर होणार नाहीये ना? अशा परिस्थितीत आता प्रियांका चोप्राची आई मधु चोप्राने तिचा अमेरिकन गायक पती निक जोनस याच्यापासून अभिनेत्रीच्या घटस्फोटाच्या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत आणि त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
तसे पाहाता बॉलीवूड स्टारच्या घटस्फोटाची चर्चा केवळ अफवा म्हणून प्रसारमाध्यमांमध्ये पोहचण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधी देखील अशा अनेक स्टार जोडींची नावं याप्रकरणांमध्ये समोर आली आहे. परंतु असे असुन देखील या जोड्या अजूनही एकत्र आहेत.
चलातर मग या जोडींबद्दल जाणून घेऊया
अलीकडेच पॉर्न फिल्ममुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला राज कुद्रा काही दिवसांपूर्वीच दीर्घ कारावास भोगून बाहेर आला आहे. अशा परिस्थितीत जेव्हा हे जोडपे या वाईट टप्प्यातून जात होते, त्यावेळी शिल्पाला तिच्या मुलांसाठी पतीपासून वेगळे व्हायचे आहे आणि आता दोघेही लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, नुकतेच या दोघांनी लग्नाचे 12 वे वर्ष एकत्र साजरे केले आहे आणि ही जोडी आगामी काळातही ते एकत्र राहतील अशी आशा आहे.
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि गौरी खान गौरी खान यांच्या लव्हस्टोरीबद्दल सर्वांनाच माहीत आहे, पण एक काळ असा होता जेव्हा या नात्यात दरी निर्माण झाली आणि याला कारण ठरली प्रियांका. एकेकाळी शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा एकमेकांच्या जवळ आले होते आणि यादरम्यान शाहरुख खान आणि गौरी खान हे दोघे वेगळे झाल्याच्या बातम्या येत होत्या, मात्र सध्या हे जोडपे एकत्र आहे आणि आपला सुखाचा संसार करत आहेत.
खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार आणि पत्नी ट्विंकल खन्ना दोघेही एकेकाळी वेगळं होणार असल्याचं म्हटलं जात होतं. हे जोडपं वेगळं होण्यामागचं कारण ठरली होती देसी गर्ल प्रियांका चोप्रा.
खरेतर जेव्हा प्रियांकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, त्यादरम्यान दोघांनी जवळपास 23 चित्रपट एकत्र केले होते आणि अशा बातम्या येत होत्या की, दोघी एकत्र चांगला वेळ घालवत आहेत. अशा स्थितीत ट्विंकल खन्ना प्रियांकाला थप्पड मारण्यासाठी शूटिंग सेटवर पोहोचली होती, त्यानंतर नवरा बायको दोघे ही वेगळे होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. परंतु या घटनेला इतकी वर्ष झाली तरी हे जोडपं एकत्र सुखाचा संसार करत आहेत.
वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या चित्रपटादरम्यान अजय देवगण आणि कंगना राणौत यांच्या जवळीकतेच्या बातम्या आल्या होत्या, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. असं म्हटलं जातं की, काजोल घरातून निघून गेली होती आणि त्यानंतर अजयने आपली चूक मान्य केली आणि काजोल त्याच्या कुटुंबाकडे परतलली होती. याप्रकरणा दरम्यान या जोडीचा घटस्फोट होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या परंतु असं न घडता हे जोडपं एकत्रं संसार थाटत आहेत.
अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यात असं नातं आहे की, ते कुणापासूनही लपलेलं नाही, अशा वेळी एकदा अशी वेळ आली होती की, रेखाने जया आणि अमिताभ यांच्या नात्यात मोठा दुरावा निर्माण केला होता. पण त्यांचे नाते जपत, जया यांनी कधीही या या भांडणाचे रुपांतर घटस्फोटात केलं नाही. हे जोडपं आता इतक्या वर्षानंतर ही एकत्र आहेत आणि सुखाचा संसार करत आहेत.