Mrunal Dhusanis daughter: अभिनेत्री मृणाल धुसानिस नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिच्या पर्सनल तर कधी तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे मृणाल नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. एखादी पोस्ट शेअर करताच ती व्हायरल व्हायला काहीच वेळ लागतो. अनेकदा ती तिच्या वक्तव्यांमुळेही चर्चेत असते. नुकतीच मृणालने दिलेल्या मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत. 'माझिया प्रियाला प्रित कळेना', 'तू तिथे मी', 'हे मन बावरे' या मालिकेत दमदार अभिनय करुन मृणालने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. लग्नानंतर चार वर्षे अमेरिकेत राहून मृणाल नुकतीच भारतात परतली आहे.
अभिनेत्रीला एक मुलगी आहे. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत मृणलने खुलासा केला आहे की, ''मी नूर्वीचं रुटीन सेट करण्याचा प्रयत्न करतेय, जे अजूनही झालेलं नाही. मी सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ बघते की त्यांची मुलं किती वाजता उठतात, केव्हा काय खातात. पण इथे मला स्वतःचच डाएट मेंटेन करणं जमत नाहीये तर लहान बाळ ते कुठून करणार. मी तिला तिच्या हाताने खायची सवय लावली आहे. तिला पियानोची ओळख करून दिली. तिला पुस्तकांमधील गोष्टी वाचून दाखवत होतो, तिथेही आणि इथेही तर ती एक तिला सवय लागली आहे,'' इथे नूर्वी आता आज्जीशी खेळते, माझ्या आईबरोबर खेळते. इथे तिला खाली मित्र मिळाली आहेत, तिथं नव्हती. इथं तिच्याशी सगळेजण मराठीतच बोलतो.
तिकडे अमेरिकेत ती फक्त 'नो' हा एकच शब्द शिकली आहे. आता ती 'आहे' हा नवीन मराठी शब्द शिकली आहे. मला तिला नॉर्मल, घरगुती ठेवावसं वाटतं. आता तिचं ती काही गोष्टी शिकतेय, मराठी बोलतेय, खाली मित्रमैत्रिणींबरोबर खेळते, तिच्याकडे सायकल आहे आता तर सायकल चालवते. मला तिला गाणं शिकवायचं आहे, तिला पोहताना शिकवायचं आहे. मला हे तिला तिकडेच शिकवायचं होतं पण आम्ही अचानक इकडे आलो त्यामुळे जितक्या लवकर ती शिकेल तितकं चांगलं आहे. बघू आता ती या सगळ्याला कसा रिस्पॉन्स करते ते,'' असं मृणाल लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.