Mika Singh गावी पोहोचताचं नवरीकडून जंगी स्वागत, गुपचूप उरकलं लग्न?

 गायक मिका सिंग कायम त्याच्या भन्नाट गाण्यांमुळे चर्चेत असतो. पण आता मात्र...   

Updated: May 5, 2022, 12:48 PM IST
Mika Singh गावी पोहोचताचं नवरीकडून जंगी स्वागत, गुपचूप उरकलं लग्न? title=

मुंबई : गायक मिका सिंग कायम त्याच्या भन्नाट गाण्यांमुळे चर्चेत असतो. पण आता मिका एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. सध्या मिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नवरीच्या रूपात अनेक मुली मिकाचं जंगी स्वागत करताना दिसत आहेत. मिका सिंगने नुकताच पंजाबमधील रोपर येथे त्याच्या आगामी 'स्वयंवर-मिका दी वोहटी' शोसाठी एक म्युझिक व्हिडीओ शूट केला आहे.

पंजाबमधील रोपर गाव आणि मिका सिंगचा फार जुनं नातं आहे. याचं नात्याबद्दल सांगताना मिका म्हणाला, 'या जागेसोबत माझ्या अनेक आठवणी आहेत. माझ्या बालपणाचा आनंद मी याचं ठिकाणी घेतला आहे. त्यामुळे ही जागा माझ्यासाठी अत्यंत खास आहे....' 

रोपर गाव मिका सिंगच्या फार जवळचं असल्यामुळे त्याने त्याच्या आगामी शोची सुरूवात गावातून केली आहे. मिका सिंग 'स्वयंवर-मिका दी वोहटी' या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून आयुष्याच्या जोडीदाराचा शोध सुरू करणार आहे. तो लवकरच स्टार भारतवर प्रसारित होणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गायक मिका सिंग स्वतःचा स्वयंवर करण्यासाठी तयार झाला आहे. 'स्वयंवर: मिका दी वोहटी' असे त्याच्या शोचे नाव आहे. याआधी रतन राजपूत, राखी सावंत आणि राहुल महाजन यांनीही नॅशनल टीव्हीवर स्वतःचा स्वयंवर रचला होता. 

दरम्यान, मिकाने गुपचूप लग्न उरकलं नसून, तो जोडीदाराच्या शोधात आहे. सध्या मिका 'स्वयंवर: मिका दी वोहटी' शोमळे चर्चेत आहे. त्यामुळ मिकाचं स्वयंवर कोणासोबत होणार? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.