पाहा 'मी वसंतराव' सिनेमाचा टीझर

कला ही कलाकाराच्या आयुष्याचा आरसा 

Updated: Mar 4, 2020, 10:35 AM IST
पाहा 'मी वसंतराव' सिनेमाचा टीझर  title=

मुंबई : 'बापजन्म','धप्पा' सिनेमातून दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांसमोर आलेला निपुण धर्माधिकारी नवा कोरा सिनेमा घेऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिवंगत संगीतकार डॉ.वसंतराव देशपांडे यांच्यावर आधारित बायोपिकचा टीझर नुकताच लाँच झाला आहे. 

डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या संगीताचा वारसा जपणारा त्यांचा नातू राहुल देशपांडे या बायोपिकमध्ये आजोबांची भूमिका साकारत आहे. डॉ. वसंतराव देशपांडे यांनी गायक, मराठी संगीत रंगभूमीवरली अभिनय अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या लीलया पेलल्या. बंदीश, ठुमरी, नाट्यसंगीत, सिनेमा, संगीत यावर त्यांची पकड होती. 

डॉ. देशपांडे यांच्या जीवनातील हे सगळे पैलू सिनेमाच्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. या सिनेमाची जबाबदारी भाडीपा फेम निपुण धर्माधिकारीने आपल्या खांद्यावर घेतली आहे. राहुल देशपांडेंनी या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत दिसत आहे. हुल देशपांडे यांनी इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. त्यांनी असं कॅप्शन दिलं आहे की, 'मी आणि निपुणने पाहिलेलं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

मराठी संगीत क्षेत्रातलं सळसळतं वादळ, ज्यानं आपल्या आक्रमक शैलीत स्वतःची ओळख सिद्ध केली... पंडित वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावरील चित्रपटाची ही पहिली झलक... मी वसंतराव... #MeeVasantrao @anitadate_kelkar @pushkarajchirputkar @ameyzone @kaumudii @nipundharmadhikari @_nikhilsane @gokhaleshekhar #NiranjanKirloskar #DarshanProductions #AjitAndhare @priyanka.barve @bhushanmate @kapoorhimani @adityaoke @vijaydayal @shreyagoshal @sarangsarod

A post shared by Rahul (@deshpanderahul) on

सिनेमात राहुल देशपांडेंसह अनिता दाते, अमेय वाघ, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर अशी कलाकरांचा अभिनय पाहता येणार आहे. सिनेमातील सुरांची मैफिल ही 1 मे 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे.