Radhika Deshpande Instagram Post : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून 'आई कुठे काय करते' या मालिकेला ओळखले जाते. या मालिकेतील सर्वच कलाकार हे प्रसिद्धीझोतात आहेत. या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून राधिका देशपांडेला ओळखले जाते. या मालिकेत तिने अरुंधतीची मैत्रीण देविका हे पात्र साकारले होते. सध्या राधिका ही ‘सियावर रामचंद्र की जय’ या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. आता राधिकाच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
राधिका देशपांडे ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. ती नेहमी इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. याद्वारे ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. आता राधिकाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तिच्या ‘सियावर रामचंद्र की जय’ या नाटकातील बालकलाकार दिसत आहेत. त्यासोबतच तिने एक हटके पोस्टही लिहिली आहे.
"माझं कुटुंब ही माझी सर्वात मोठी ताकद आहे. काहीही झालं तरी आम्ही आहोत. काही व्हायलाच कशाला पाहिजे, आम्ही आहोतच! असं जेंव्हा कुटुंब असतं तेंव्हा निवडणुका होत नाहीत कारण आम्ही असतो हर बार चारसो पार. सगळ्यांना घेऊन चालणे, सगळ्यांसोबत चालणे मला माहिती आहे. माझ्या घराची वीट अन् वीट जोडतात ते विद्यार्थीच नव्हे तर त्यांचे आई वडीलही. मी कुटुंबवत्सल राधिका क्रिएशंस!", असे राधिका देशपांडेने म्हटले आहे.
राधिकाच्या या पोस्टवर अभिनेते शरद पोंक्षे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर शरद पोंक्षेंनी "लहानग्यांकडून रामायण करून घेणं सोपं नाही फार मोठं कार्य करतेयस", अशी कमेंट केली आहे.
दरम्यान ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री राधिका देशपांडेने मालिका व चित्रपटांत काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सध्या राधिका तिच्या ‘सियावर रामचंद्र की जय’ या बालनाट्याच्या प्रयोगांमध्ये व्यग्र आहे. राधिकाने या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे.