Akshaya Deodhar : 'पाठकबाईं'नी इन्स्टाग्रामवरून शेअर केली गुडन्यूज, पाहा Photo

Akshaya Deodhar Instagram Post : अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी (Akshaya Deodhar and Hardik Joshi) हे मराठी मनोरंजन विश्वातील सर्वात चर्चेत असलेले दांपत्य आहे. अक्षायने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना गूडन्यूज दिली आहे. 

Updated: Jun 6, 2023, 11:39 AM IST
Akshaya Deodhar : 'पाठकबाईं'नी इन्स्टाग्रामवरून शेअर केली गुडन्यूज, पाहा Photo  title=
Akshaya Deodhar Shared Good News

Akshaya Deodhar Shared Good News : सर्वांच्या लाडक्या पाठकबाई म्हणजे अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar). आतापर्यंत विविध मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिच्या कामासोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी तिने अभिनेता हार्दिक जोशीसोबत लग्न केले. त्यानंतर आता तीने  इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना गूडन्यूज दिली आहे. 

अक्षया (Akshaya Deodhar) नेहमीच नवनवीन प्रयोग करत असते. तिचे चाहतेदेखील तिच्या आयुष्यात काय सुरु आहे हे जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात.अभिनयासोबतच अभिनेत्री अक्षया सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती वेगवेगळ्या स्टाईलमध्ये तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तसेच हार्दिकबरोबक काही रील्स करत ते देखील ती शेअर करत असते. तिच्या पोस्टवर चाहते भरभरुन कमेंट्स करत असतात. आता देखील अक्षयांने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ही बातमी ऐकूण चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.     

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshaya_Devdhar (@akshayadevdhar_)

अक्षयाची पोस्ट काय आहे?

अक्षय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आता तीने एक नवीन प्रयोग केला असून त्याच प्रयोगाची माहिती अक्षयने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली. अक्षयाने स्वत:चा यूट्यूब चॅनल सुरू केले आहे. याची माहिती तिने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत केली. त्यात अक्षयाने तिचे स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू केल्याचे म्हटले आगे. याचबरोबर तिने या स्टोरीमध्ये या नव्या YouTube चॅनेलची लिंक देऊन चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती केली आहे. 

अक्षयाने पहिला व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात अक्षया तिचा पहिली वटपौर्णिमा साजरी करताना दिसली आहे. हा व्हिडिओ अक्षयाने यूट्यूब चॅनलवर पोस्ट केला आहे की त्याचे नवीन काम सुरू केले आहे. या तिच्या वटपौर्णिमेच्या व्हिडिओमध्ये अक्षया पिवळ्या रंगाची साडी घालून झाडाची पूजा करताना दिसत आहे. आता तिच्या या नवीन यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून ती काय काय नवीन गोष्टी चाहत्यांशी शेअर करणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.