Bhool Bhulaiyaa Remake: एखादा चित्रपट सुपरहिट झाला तर बॉलिवूडमध्ये याच एका मुद्द्यावर अनेक चित्रपट बनवले जातात. बॉक्स ऑफिसवर सध्या असाच एक फॉर्म्युला सध्या बॉक्स ऑफिसवर हिट होत आहे. इतकंच नव्हे तर हा फॉर्म्युला एक दोन नव्हे तर तब्बल 8वेळा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. एकाच भाषेत नाही तर वेगवेगळ्या भाषेत यावर चित्रपट बनवण्यात आले आहेत. एकाच चित्रपटाचे कित्येकवेळा रिमेक बनवण्यात आले आहेत आणि हे रिमेक बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबास्टर ठरले आहेत. बॉलिवूडमध्येच या चित्रपटावर तीनदा रिमेक बनवण्यात आले आहेत. अलीकडेच आलेल्या रिमेकने तीन दिवसांत शंभर कोटींची कमाई केली आहे.
भुल भुलैया या चित्रपटाचे आत्तापर्यंत अनेक रिमेक करण्यात आले आहेत. मुळातच बॉलिवूडच्या भूल भुलैया हा चित्रपट साउथचा रिमेक आहे. त्यानंतर भूल भुलैया 2 आणि 3 रिलीज झाले. सगळ्यात पहिले सायकॉलॉजिकल हॉरर मुव्ही 1993मध्ये मल्याळम भाषेत चित्रीत करण्यात आला होता. या चित्रपटाचे नाव मणिचित्राथजू असं होतं. हा चित्रपट हिट ठरला होता. नंतर या चित्रपटाचे वेगवेगळ्या भाषेत रिमेक करण्यात आले आहेत. 2004 मध्ये कन्नड भाषेत अपथमित्रा नावाने बनवण्यात आला होता. नंतर 2005मध्ये तामिळमध्ये रिमेक बनवण्यात आला होता. या चित्रपटाचे नाव होतं चंद्रमुखी. नंतर 2005 मध्ये हा चित्रपट बंगाली भाषेत बनवण्यात आला होता. ज्याचं नावं राजमोहोल असं होतं. 2007 मध्ये बॉलिवूडमध्ये भूल भुलैया चित्रपट प्रदर्शित झाला होता.
या चित्रपटाचा दुसरा पार्ट 2022मध्ये रीलीज झाला होता. तर आता तिसरा पार्ट प्रदर्शित झाला आहे. एका रिपोर्टनुसार, चित्रपट रिलीज झाल्यानंतर चौथ्याच दिवशी 17.50 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर आज चित्रपटाची कमाई 123.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी, माधुरी दीक्षित आणि विद्या बालन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रेक्षकांकडून या सिनेमाला भरभरुन प्रेम मिळालं आहे.
sacnilk च्या रिपोर्टनुसार, भुल भुलैया 3 ने तिसऱ्या दिवशी 33.5 कोटींचे कलेक्शन केले होते. ज्यात दुसऱ्या दिवशी कलेक्शनच्या तुलनेत 9.46 टक्क्यांची घट झाली आहे. तर, दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशीचे कलेक्शन 33.5 कोटी आणि दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन 37 कोटी इतकं होतं. तीन दिवसांचे कलेक्शन आत्तापर्यंत 106 कोटींचे कलेक्शन झाले आहे.