रांगड्या मातीत घेऊन जाणार सुजय डहाकेचा 'केसरी' : Official Trailer

सामन्यासारखा सराव दररोज केला तर सराव केल्यासारखा सामना निघून जाईल

Updated: Feb 14, 2020, 07:37 AM IST
रांगड्या मातीत घेऊन जाणार सुजय डहाकेचा 'केसरी' : Official Trailer

मुंबई : 'शाळा','आजोबा','फुंतरू' सारखे यशस्वी सिनेमे दिल्यानंतर दिग्दर्शक सुजय डहाके नवा कोरा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्राच्या मातीतील कुस्ती आपल्याला 'केसरी-Saffron' सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'केसरी'चा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. 

महाराष्ट्राच्या रांगड्या मातीत लहानाचा मोठा झालेला विराट मडके या सिनेमात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून विराट पहिल्यांदाच रुपेरी प़डद्यावर झळकणार आहे. 

'कुस्ती' हा रांगड्या मातीचा खेळ असला तरी त्याचा खर्च सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेला आहे. अशा परिस्थितीत एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याचे स्वप्न बघतो आणि ते पूर्णत्वास कसे नेतो याचा संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Coming soon. #kesari #केसरी #behindthescenes #sujaydahake #tourdedahake

A post shared by Sujay Dahake (@tour_de_dahake) on

या सिनेमात विराट मडके, महेश मांजरेकर, विक्रम गोखले, मोहन जोशी, प्रवीण तरडे, नंदेश उमप या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहे. या सिनेमाचे संकलन आणि दिग्दर्शन सुजय डहाकेने केलं आहे. हा सिनेमा 28 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे.