मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी एसएससी बोर्डाच्या परीक्षांचा निकाल उशिराने जाहीर करण्यात आला. यंदाचा राज्याचा निकाल एकूण ९५.३० टक्के लागला आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा लागला आहे. यंदा अभिनेता प्रसाद ओकच्या मुलाचा मयांकचा देखील दहावीचा निकाल जाहीर झाला आहे.
मयांक ओकने यंदा दहावीची परीक्षा दिली होती. त्याचा निकाल प्रसाद ओकने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचप्रमाणे प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओकने देखील इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. ‘चि. मयंक ओक.. दहावी परीक्षेत ९० टक्के.. अभिमान आणि प्रेम’, अशी पोस्ट प्रसादने लिहिली. याचसोबत त्याने मयंकचा फोटो पोस्ट केला
मयांक ओकला दहावीच्या परीक्षेत ९०% गुण मिळवले आहेत. मयांकने दहावीच्या वर्षाकरता भरपूर मेहनत घेतल्याचं अनेकदा प्रसाद ओक यांनी सांगितलं आहे. प्रसाद ओक यांनी आपल्या मुलांना अतिशय सामान्य जीवन दिलं आहे. दहावीपास होईपर्यंत आपली मुलं सोशल मीडियावर नसतात. एवढंच नव्हे तर त्यांच्याकडे स्मार्टफोनही नाही याची कबुली दिली आहे.
मंजिरी ओकला आपल्या मुलाचा अतिशय अभिमान आहे. इयत्ता दहावी म्हणजे आपल्याकडे जवळ जवळ एक युद्ध चालू असतं..सगळ्यांचच आपापल्या परीने ..आज हे युद्ध जिंकून हा योद्धा आम्हाला परत एकदा अभिमान वाटेल असं वागला आहे ... त्याला ९० % मिळाले आहेत .. त्याचं खूप कौतुक .. आणि त्याच्या सारख्या सगळ्या योध्यांच अभिनंदन.
मंजिरी ओकने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये आपल्या मुलाबद्दलचा अभिमान दिसतो. प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांचा मोठा मुलगा सार्थक ओक परदेशात आपलं शिक्षण घेत आहे.