मुंबई : मुंबईच्या झगमगत्या जगात हजारो लोकं काम करतात. त्यामध्ये एका मोठ्या कलाकारापासून ते एका छोट्या कामगाराचा देखील मोलाचा वाटा असते. मात्र या दोघांना दिली जाणारी वागणूक अत्यंत वेगळी असते. अभिनेत्री कंगना रानौत कायम तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. परंतु आता तर तिने एक व्हिडिओ शेअर करत सेटवरील कामगारांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीचं वास्तव समोर आणलं आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
All Bullywood hyenas gathered to attack the media for calling them names, I want to ask them why don’t they show such unity to stand for injustice done to labourers, women, stuntmen? They demand their own human rights but show absolute dispassionate for others human rights. https://t.co/Yf9RvX9TKs
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 14, 2020
या व्हिडिओच्या माध्यमातून तिने माध्यमांविरूद्ध खटले दाखल केलेल्या सर्व बॉलिवूड निर्मात्यांवर निशाणा साधला आहे. कंगना म्हणते मीडियावर बॉलिवूडकरांनी प्रत्येक वेळी आपले अधिकार आणि हक्कांसाठी मतं मांडली. मात्र दररोज सेटवर कामगारांना मिळणाऱ्या वागणुकीवर कोणी एकाने आतापर्यंत आवाज उचलला नाही.
ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'सध्या बॉलिवूडकर मीडियाविरूद्ध एकत्र आले आहेत. मला त्यांना एक विचारायचं आहे? कामगार, महिला आणि स्टंटमॅनवर होणाऱ्या अन्यायावर उभे राहण्यासाठी ते असे ऐक्य का दर्शवित नाहीत? ते त्यांच्या स्वत: च्या मानवी हक्कांची मागणी करतात परंतु, इतरांसोबत अगदी विरूद्ध वागतात.' असं तिने लिहिले आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ २०१७ सालचा आहे. ज्याला 'लिविंग ऑन द एज' असं देखील म्हटलं जातं. व्हिडिओमध्ये बॉलिवूड कामगारांना कामाच्या स्थळी दिल्या जाणाऱ्या दुय्यम दर्जाच्या वागणुकीचे वास्तव दिसत आहे.