शबाना यांच्या तब्येतीविषयी जावेद अख्तरांची माहिती

सध्या त्यांच्यावर मुंबईच्या कोकिलाबेन रूग्णालयात उपचार सुरू आहेत.  

Updated: Jan 20, 2020, 10:45 PM IST
शबाना यांच्या तब्येतीविषयी जावेद अख्तरांची माहिती title=

मुंबई : शनिवारी बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमींच्या कारचा अपघात झाला. शबाना आझमींची कार मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर एका ट्रकला धडकली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईच्या कोकिलाबेन रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची परिस्थिती आता स्थिर असल्याचं समोर येत आहे. तर त्यांच्या तब्यतीबद्दल जावेद अख्तर यांनी माहिती दिली आहे. 

शबाना आझमींच्या डोळ्यांला आणि डोक्याला अधिक मार लागला असल्याचे सांगत ते म्हणाले की, 'सध्या त्या आयसीयूमध्ये आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांना कोणतीही गंभीर जखम झालेली नाही.' जेव्हा त्यांच्या गाडीचा अपघात झाला तेव्हा जावेद अख्तर देखील तेथे होते.  

शबाना आझमींच्या ड्रायव्हरविरोधात FIR मात्र अटक नाही

शबाना आझमींच्या अपघाताची बातमी कळताच बॉलिवूड मधील अनेक कलाकार त्यांच्या भेटीसाठी रूग्णालयात दाखल झाले. शबाना यांना पाहायला तब्बू, अनिल कपूर यांच्यासह अन्य सेलिब्रिटीही रुग्णालयात पोहोचले होते.

अपघातानंतर ट्रक ड्रायव्हरने शबाना आझमी यांच्या ड्रायव्हर विरोधात एफआयआर दाखल केली. पोलिसांनी देखील ड्रायव्हर अमलेश कामत विरोधात तक्रार दाखल केली. खालापूरमध्ये ट्रक ड्रायव्हरने शबाना आझमी यांच्या ड्रायव्हर विरोधात तक्रार दाखल केली. 

रॅश ड्रायव्हिंगमुळे ही कार मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर एका चालत्या ट्रकला आदळली. ज्यामध्ये शबाना आझमी गंभीर स्वरूपात जखमी झाल्या. अपघातानंतर शबाना आझमी यांना नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन रूग्णालयात शिफ्ट करण्यात आलं आहे. आता तिच्यावर तेथे उपचार सुरू आहेत. आता शबाना आझमींची तब्बेत स्थिरावली असल्याचं सांगण्यात येत आहे.