'या' सिनेमात एकत्र झळकणार नवाज-श्वेता

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अभिनेत्री श्वेता त्रिपाठी पुन्हा एकदा चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Updated: Feb 27, 2019, 06:15 PM IST
'या' सिनेमात एकत्र झळकणार नवाज-श्वेता

मुंबई : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अभिनेत्री श्वेता त्रिपाठी पुन्हा एकदा चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. याआधी दोघांनी 2017 मध्ये आलेल्या 'हरामखोर' सिनेमात एकत्र काम केले होते. श्वेता-नवाज ‘रात अकेली हैं’ सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत. मास्टर ऑफ द क्राफ्ट सोबत काम करणे म्हणजे एक चांगला अनुभव असल्याचे सांगत हे दोघे दुसऱ्यांदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. त्याचबरोबर अभिनेत्री राधीका आपटेची सुद्धा या सिनेमात वर्णी लागणार आहे.  

श्वेता म्हणते, 'रात अकेली हैं' सिनेमामध्ये नवाज सोबत काम करण्याची संधी मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे. 'हरामखोर' सिनेमाच्या माध्यमातून मी सिनेसृष्टीत पदार्पण केले. मी स्वता:ला खूप भाग्यशाली समजते कारण मला एका अनुभवी कलाकारासोबत काम करण्यची संधी मिळाली.' 

 

अॅमेझॅन प्राइम वेब सिरीज 'मिर्झापुर' मध्ये श्वेताने गोलू गुप्ताची भूमिका साकारली होती. या गोलू गुप्ताच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले. अभिनेता रणवीर सिंग स्टारर सिनेमातील रॅपर स्लो चीता सोबत श्वेता विवाह बंधणात अडकली आहे.