अश्लील व्हिडीओनंतर Gautami Patil चा पुन्हा एक नवा VIDEO समोर, पाहून चाहते हैराण

Gautami Patil चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत गौतमीला पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. त्यांना गौतमीला या अवस्थेत पाहून आश्चर्य झाले.

Updated: Feb 26, 2023, 01:58 PM IST
अश्लील व्हिडीओनंतर Gautami Patil चा पुन्हा एक नवा VIDEO समोर, पाहून चाहते हैराण title=

Gautami Patil Panjabi Industry : सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गौतमी पाटीलवर काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गौतमी विरोधात या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. याशिवाय अश्लील डान्स केल्यामुळे गौतमी चर्चेत आली होती. गौतमी तिच्या डान्ससोबतच तिची सुंदरता आणि फॅशनसाठी ओळखली जाते. गौतमीचे लाखो चाहते आहेत. दरम्यान, आता गौतमीनं पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. पंजाबी अल्बममधील एका गाण्यात गौतमी झळकली आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

गौतमी पाटील ज्या अल्बममध्ये दिसली त्याचं नाव 'तेरा पता' (Tera Pta) असे आहे. गौतमीचं हे गाणं Yamdoot Productions नं त्यांच्या युट्यूब अकाऊंटवरून शेअर केलं आहे. या गाण्यात गौतमीचा रोमॅंटिक अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्सही केल्या आहेत. काही चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे तर दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

हेही वाचा : Kangana Ranaut च्या निशाण्यावर आता अक्षय कुमार म्हणाली, 'फ्लॉप...'

गौतमीला इतकी लोकप्रियता मिळाली आहे की आजकाल अनेक लोक तिला अभिनेत्री समजू लागले आहेत. इतकंच काय तर गौतमी लवकरच 'घुंगरु' या तिच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करंतर काही दिवसांपूर्वीच गौतमी चित्रपटाच्या शूटिंगसाठी थायलंडला गेली होती. 

दरम्यान, गौतमी विरोधात कलम 294 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याविषयी साताऱ्यातील महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा शेलार यांनी हा अर्ज दाखल केला होता. 21 डिसेंबर रोजी शेंद्रे-सोनगाव येथे लावणी कार्यक्रमात पार पडला होता. या कार्यक्रमात गौतमीने अश्लिल डान्स केला असा आरोप तिच्यावर करण्यात आला होता.

या कार्यक्रमात गौतमीनं सतत अश्लील चाळे केले असे म्हटले जात होते. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे अश्लील कृत्य करण्याविरोधात गौतमीवर भारतीय दंड संहिता कलम 294 गुन्हा दाखल करामा, अशी मागणी प्रतिभा यांनी न्यायालयाकडे केली होती.