मुंबई : कपिल शर्मा पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. कपिलने ट्विटरवर काही अपशब्द वापरल्यानंतर तो अडचणीत आला होता. आता तो एका वेबपोर्टलच्या एडिटरला फोन करुन धमकावल्यामुळे आणि शिवीगाळ केल्यामुळे अडचणीत आला आहे. कपिलच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कपिलच्या विरोधात वेबसाईटचे एडिटर विक्की लालवानी यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांचा आरोप आहे की, कपिल शर्माने फोन करुन त्यांना शिवीगाळ केली. मुंबईतील पवई पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस यां संदर्भात पुरावे तपासत आहेत.
काही दिवसांपूर्वीच एक ऑडियो इंटरनेटवर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये कपिल शर्मा हा विक्की लालवानींना शिवीगाळ करतांना ऐकू येत आहे. कपिल शर्मा सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. शिल्पा शिंदेने कपिलचं समर्थन केलं आहे. कृष्णा अभिषेकने देखील कपिलचं समर्थन केलं आहे.